विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी प्रिन्सेस पद्माराजे हायस्कूलमध्ये 'इंटरॅक्ट क्लब'चा पदग्रहण सोहळा उत्साहात
schedule24 Aug 26 person by visibility 138 category
कोल्हापूर : दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे रोटरी क्लब ऑफ करवीर यांच्या सहकार्याने 'इंटरॅक्ट क्लब इन्स्टॉलेशन्स सेरेमनी – २०२६' अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. 'नेतृत्व, सेवा आणि सामाजिक बांधिलकी' या मूल्यांवर आधारित या कार्यक्रमाची सुरुवात रोपाला पाणी घालून करण्यात आली.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागतपर मनोगत व्यक्त केले. माजी प्रेसिडेंट नारायणी सूर्यवंशी यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभव मांडले, तर माजी सेक्रेटरीने 1 उपक्रमांचा अहवाल सादर केला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेल्या पदग्रहण सोहळ्यात, रोटरी क्लब ऑफ करवीरचे अध्यक्ष तथा पदग्रहण अधिकारी नारायण भोई यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांना पदाची जबाबदारी प्रदान करण्यात आली. रोटरी परंपरेनुसार माजी अध्यक्षा नारायणी सूर्यवंशी हिने नवनिर्वाचित अध्यक्षा लावण्या राठोड हिला, तर माजी सचिव आसावरी मांगले हिने नवनिर्वाचित सचिव गौरी पाटील हिला कॉलर प्रदान करून पदभार सोपविला.
नूतन अध्यक्षांनी आपल्या मनोगतात आगामी वर्षात विद्यार्थिनींच्या नेतृत्वगुणांना चालना देणे आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
या समारंभास रोटरीयन शितल दुग्गे, रोटरीयन दिलीप प्रधाने, उपमुख्याध्यापक रत्नाकर घाटगे, पर्यवेक्षक अंजली आंबर्डेकर आणि कोऑर्डीनेटर अस्मिता मेथे पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ करवीरचे सेक्रेटरी डॉ. डी. आर. भोसले आणि रोटरीयन निशिकांत नलवडे यांनी विद्यार्थिनींना नेतृत्व, सेवा आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार नूतन सेक्रेटरी गौरी पाटील हिने मानले, तर सूत्रसंचालन मृणाल कुलकर्णी यांनी केले. “लिडरलशिप थ्रू सर्व्हिस” या भावनेने सुरू झालेल्या या नव्या कार्यकाळामुळे विद्यार्थिनींमध्ये संघभावना व सेवाभाव विकसित होण्यास मदत होणार आहे.