SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
ग्रँड रेसिडेन्सी अपार्टमेंटच्या सामासिक अंतरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाईकोरे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची गॅलेक्सी सर्फॅक्टंट्समध्ये निवड; ६ लाखांचे पॅकेजबालकांमधील लठ्ठपणा, मधुमेह, थायरॉईड आजारांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन गोकुळ दूध संघाचे निवडणूक अधिकारी देविदास मिसाळ व नारायण परजने यांच्याविरुद्ध 'सु-मोटो' अवमान कारवाईची नोटीसअग्निवीर भरती मेळावा अनुषंगाने आढावा बैठक संपन्न डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये नवोदित विद्यार्थ्यांचे 'इंडक्शन प्रोग्राम'द्वारे उत्साहात स्वागतकोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 6 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाईप्लास्टिक बंदी नियमावलीबाबत व्यापारी व व्यावसायिकांना मार्गदर्शनईद फेस्टिवल भव्य इस्लामिक क्विझ कॉन्टेस्ट; दिवाळी सुट्टीनंतर रंगणार स्पर्धागतिमान नेतृत्व, विकासाची दृष्टी आणि सामाजिक बांधिलकीचा संगम : संजय पाटील यड्रावकर

जाहिरात

 

धर्मेंद्र प्रधान तडकाफडकी राजीनाम्यानंतर CJP चा मोठा विजय; जंतर-मंतरवरील धरणे आंदोलन अखेर मागे!

schedule25 Jul 26 person by visibility 561 categoryदेश

नवी दिल्ली :  येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि केंद्र सरकार यांच्यात झालेल्या निर्णायक बैठकीत CJP च्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीनंतर, CJP चे प्रवक्ते सौरभ दास यांनी पत्रकार परिषद घेऊन जंतर-मंतरवरील तीव्र आंदोलन तात्काळ प्रभावाने संपवण्याची अधिकृत घोषणा केली.

सरकारने मान्य केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये CJP च्या दबावामुळे आधीच राजीनामा दिलेले केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, दिल्लीसह देशभरातील आंदोलकांवर दाखल केलेले सर्व एफआयआर आणि कायदेशीर गुन्हे मागे घेणे, तसेच भविष्यात कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याचे आश्वासन समाविष्ट आहे. 

याशिवाय, नियमांनुसार जास्तीत जास्त आर्थिक मदत व भरपाई देण्याचेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या विजयानंतर CJP कार्यकर्त्यांनी जंतर-मंतरवर जोरदार जल्लोष केला असून, हा जनतेच्या आणि विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा ऐतिहासिक विजय असल्याचे CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी म्हटले आहे. आगामी काळात व्यापक शैक्षणिक सुधारणांवर चर्चा करण्यासाठी सरकारसोबत पुन्हा बैठक पार पडणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes