कोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 6 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाई
schedule08 Sep 26 person by visibility 164 categoryमहानगरपालिका
◼️ थकबाकीपोटी रू.2 लाख 95 हजार 847 रक्कम थकबाकीदारांकडून वसूल
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागामार्फत शहर व संलग्नीत ग्रामीण भागात थकबाकीदार व अनाधिकृत नळ कनेक्शनविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शहर व ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार तसेच अनाधिकृत नळ कनेक्शनधारकांचे कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई वेळोवेळी करण्यात येत आहे.
याअंतर्गत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभाग व उपद्रव शोध पथकामार्फत शहरातील विक्रमनगर परिसरात मोठे थकबाकीदार नळ कनेक्शनधारक यांच्यावर कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान 6 थकबाकी धारकांची कनेक्शन तोडण्यात येऊन थकबाकीपोटी रू.2 लाख 95 हजार 847 रक्कम थकबाकीदारांकडून वसूल करण्यात आली आहे.
सदरची कारवाई आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशाने, अतिरीक्त आयुक्त शिल्पा दरेकर व जल अभियंता हर्षजीत घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमध्ये पथक प्रमुख बाळासाहेब पठाण, संजय चौगुले, काका बनसोडे, निरंजन चव्हाण, शाखा अभियंता सुनिल भाईक, कनिष्ठ लिपिक दादाभाऊ पाटोळे, अरुण प्रभावळे, मिटर रिडर गणेश देसाई, निरंजन चव्हाण, कोमल भोसले यांनी प्रमुख सहभाग घेतला.