SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बालकांमधील लठ्ठपणा, मधुमेह, थायरॉईड आजारांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शनसहकार क्षेत्रात मोठी खळबळ : गोकुळ दूध संघाचे निवडणूक अधिकारी देविदास मिसाळ व नारायण परजने यांच्याविरुद्ध ‘सु- मोटो’ अवमान कारवाईचे आदेश अग्निवीर भरती मेळावा अनुषंगाने आढावा बैठक संपन्न डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये नवोदित विद्यार्थ्यांचे 'इंडक्शन प्रोग्राम'द्वारे उत्साहात स्वागतकोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 6 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाईप्लास्टिक बंदी नियमावलीबाबत व्यापारी व व्यावसायिकांना मार्गदर्शनईद फेस्टिवल भव्य इस्लामिक क्विझ कॉन्टेस्ट; दिवाळी सुट्टीनंतर रंगणार स्पर्धागतिमान नेतृत्व, विकासाची दृष्टी आणि सामाजिक बांधिलकीचा संगम : संजय पाटील यड्रावकर जागतिक प्रगतीचा पाया: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनकोल्हापुरात १७ सप्टेंबरपासून लष्कर भरती मेळावा

जाहिरात

 

बालकांमधील लठ्ठपणा, मधुमेह, थायरॉईड आजारांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

schedule08 Sep 26 person by visibility 169 categoryआरोग्य

◼️डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये बालकांमधील एंडोक्राइनोलॉजीवर परिषद संपन्न

कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये बालकांमध्ये वाढत असलेला लठ्ठपणा, मधुमेह, वाढीमधील समस्या तसेच हाडांशी संबंधित आजार आणि विविध अंतःस्रावी विकारांच्या (एंडोक्राइनोलॉजी) आधुनिक निदान व उपचारपद्धतींबाबत मार्गदर्शन करणारी वैद्यकीय परिषद व कार्यशाळा संपन्न झाली.

डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागातर्फे कोल्हापूर बालरोगतज्ज्ञ संघटना आणि अखिल भारतीय एंडोक्राइन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. बाल व पौगंडावस्थेतील मुलांमधील विविध अंतःस्रावी ग्रंथींचे आजार, त्यांचे निदान, उपचार आणि आधुनिक वैद्यकीय व्यवस्थापन यावर परिषदेत सखोल चर्चा करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ डॉ. वामन खाडिलकर, डॉ. अनुराधा खाडिलकर आणि डॉ. गणेश जवळेकर यांनी बालक व पौगंडावस्थेतील मुलांमधील विविध अंतःस्रावी विकारांवर मार्गदर्शन केले. वाढत्या लठ्ठपणामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या, बालमधुमेह, मुलांची उंची व वाढीशी संबंधित विकार, तसेच हाडांचे आजार याबाबत तज्ज्ञांनी सविस्तर माहिती दिली. या आजारांच्या प्रतिबंधासोबतच उपलब्ध असलेल्या आधुनिक उपचारपद्धती आणि वैद्यकीय व्यवस्थापनातील नव्या दृष्टिकोनांवरही चर्चा झाली.

कार्यशाळेचे उद्घाटन डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेला कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सुमारे ८० बालरोगतज्ज्ञांनी सहभाग नोंदविला. यावेळी कोल्हापूर बालरोगतज्ज्ञ संघटनेचे पदाधिकारी डॉ. विजय गावडे, डॉ. मिलिंद सदावर्ते आणि डॉ. रुचिका यादव , एंडोक्राइन विषयातील तज्ज्ञ डॉ. अनिकेत कुंभोजकर आणि डॉ. इशिता भौमिक यांची विशेष उपस्थिती होती.

संयोजन समिती प्रमुख आणि डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागप्रमुख डॉ. निवेदिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमासाठी विभागातील डॉ. मोहन पाटील, डॉ. सुहास कुलकर्णी, डॉ. निगडे आणि डॉ. श्रद्धा कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती  डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील,  कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा,  वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes