नेपाळ येथील स्पर्धेत जानवी लोढाचे दुहेरी यश श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
schedule16 May 25 person by visibility 265 categoryक्रीडा

कोल्हापर : नुकत्याच नेपाळ येथे झालेल्या १० व्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत नरके पन्हाळा पब्लिक स्कूलच्या जानवी राहुल लोढा हिने सुवर्ण आणि कास्य पदक असे दुहेरी यश मिळवले आहे . शितो-रियो कराटे डो असोसिएशन, थामेल डोजो नेपाळ यांच्या वतीने काठमांडू नेपाळ येथे नुकत्याच झालेल्या १० वी आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा संपन्न झाली .
नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल पन्हाळा या शाळेची विद्यार्थिनी जानवी राहुल लोढा हिने काता प्रकारात सुवर्णपदक तर कुमिते(फाईट )प्रकारात कास्य पदकाचा बहुमान मिळवला या स्पर्धेत नेपाळ बरोबर भारत, बांगलादेश, श्रीलंका, भूतान इत्यादी देश सहभाग झाले होते.
जानवीला मुख्याध्यापक महेश्वरी चौगुले , क्रीडा शिक्षक अमर मिरजे, अविनाश पाटील यांच्यासह संतोष क्षीरसागर , महेश भोकरे सतिश वडणगेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तिची आता श्रीलंकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .