SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्र देशात आदर्श ठरणार : आ. राजेंद्र पाटील-यड्रावकरजागतिक वर्षावन दिन: पृथ्वीच्या फुफ्फुसांचे संरक्षण काळाची गरज बारावा आंतरराष्ट्रीय योगदिन शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरा, योग साधना ही जीवन पध्दती बनवण्याची गरज : खासदार धनंजय महाडिकऑलिंपिकपटू बंडा पाटील यांना 'खाशाबा जाधव' पुरस्कार जाहीरआंतरराष्ट्रीय योग दिवस: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत योगाभ्यासआजारांना दूर ठेवण्यासाठी योग हा रामबाण उपाय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसशाहू महाराजांच्या विचारांचा वारसा यड्रावकर बंधू चालवत आहेत : उद्योग मंत्री उदय सामंतरोटरी सेंट्रलचे डॉ.शेंडगे प्रेसिडेंट तर अविनाश चिकनिस सेक्रेटरीडॉ . बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची 100 % निकालाची परंपरा कायम ; विशेष प्राविण्यसह विद्यार्थ्यांची उल्लेखनीय भरारीयोगातून निरोगी जीवनाचा संदेश; ‘गोकुळ’मध्ये जागतिक योग दिन साजरा...

जाहिरात

 

जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्र देशात आदर्श ठरणार : आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर

schedule22 Jun 26 person by visibility 117 categoryआरोग्य

🟣 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर व अत्याधुनिक प्रसुतीगृहाचे उद्घाटन

जयसिंगपूर : राज्यात अव्वल स्थान पटकावलेल्या जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राने आता देशपातळीवर आदर्श निर्माण करण्याची वाटचाल सुरू केली आहे. येथे सुरू करण्यात आलेले अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि प्रसुतीगृह हे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेसाठी नवे मॉडेल ठरणार असून, तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी शासनाकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात देशातील पहिले मॉड्युलर ऑपरेशन थिएटर व अत्याधुनिक प्रसुतीगृह उभारण्यात आले असून, त्याचे उद्घाटन रविवारी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, इन्फोसिसच्या ट्रस्टी प्रिती वेद,  आणि मान्यवरांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना प्रिती वेद यांनी, जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राने राज्यात मानाचे स्थान मिळविले असून मॉड्युलर ऑपरेशन थिएटर व प्रसुतीगृहामुळे त्याचा दर्जा आणखी उंचावला आहे.

 इन्फोसिस फाऊंडेशनने या प्रकल्पासाठी सहकार्य केले असून भविष्यातही आरोग्य केंद्राच्या उन्नतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले.

स्वागत व प्रास्ताविकात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांडूरंग खटावकर यांनी जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्यानंतर आरोग्य सेवांच्या गुणवत्तेत सातत्याने वाढ होत असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, ड्रॅगन कंपनीचे विनायक आरगे, कुर्ल्याचे तहसीलदार दिलीप रायण्णावर आणि प्रणोती पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, प्रचिता कोळी, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे, पंचायत समिती सदस्या दिप्ती जाधव, पंचायत समिती सदस्य बाबासो वनकोरे, विनोद घोडावत, दिनेश खाडे, डॉ. बी.एस. पाटील, डॉ. ए.एस. पाटील, डॉ. शितल पाटील, डॉ. प्रवीण जैन, डॉ. विक्रम जैन, सीमा म्हैसाळे, डॉ. अकलग चौगुले, डॉ. निखील मगदूम, डॉ. रियाज अत्तार, नंदकुमार बलदवा, सुदर्शन कदम, रोहित कुसनाळे, अशुतोष पाटील यांच्यासह रोटरी, इनरव्हील आणि आरोग्य केंद्राचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार बी. टी. नाईक यांनी मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes