शिवाजी विद्यापीठामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात
schedule01 Aug 26 person by visibility 93 categoryसामाजिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ.राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.
यावेळी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, डॉ.रामचंद्र पवार, डॉ.रणधीर शिंदे, डॉ.एस.जी.घाणे, अध्यासनाचे समन्वयक डॉ.ए.एम.सरवदे, डॉ.प्रभंजन माने, डॉ.तृप्ती करेकट्टी, डॉ.आर.जी.बारवेकर, डॉ.एम.एस.वासवाणी, डॉ.धनंजय सुतार, डॉ.मचंछिद्र गोफणे, उपकुलसचिव डॉ.विभा अंत्रेडी, डॉ.उत्तम सकट, डॉ.निलेश बनसोडे, सुरेश बंडगर, सुरेखा आडके, अनिल साळोखे, अरविंद पाटील, बाबुराव तिळणे यांचेसह विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्रशासकीय सेवक, अधिकारी आणि शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिक्षणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. रुपाली संकपाळ, डॉ. विद्यानंद खंडागळे, रत्नदीप पाटील, रुचिता थरोली, सना शेख, प्रवीण मोरे, शुभम गायकवाड यांचेसह अधिविभागातील प्राध्यापक, शिक्षक, संशोधक विद्यार्थी, एम.एड., बी.एड., एम.एड. एकात्मिक आणि बी.एस्सी.-बी.एड. (ITEP) चे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.