SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोरे पॉलिटेक्निक येथे विद्यार्थी परिचय व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात राधानगरी पर्यटन विकास प्राधिकरणाच्या कामास गती द्या : पालकमंत्री प्रकाश आबिटकरसर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या धज्जिया उडवणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कठोर कारवाई कराउपसंचालक प्रवीण टाके यांची छत्रपती संभाजीनगर येथे बदलीउपेक्षितांच्या वेदनेला वाचा फोडणारे युगपुरुष: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भारतीय असंतोषाचे जनक: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक सैनिक टाकळीत भव्य क्रीडांगण, सैनिकी स्कूल आणि सैनिकी कॅन्टीन उभारणार : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरविकसित भारताच्या निर्मितीत शिक्षकांचे योगदान मोलाचे : केंद्र मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटीलआंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ. मुफज्जल लकडावाला यांचा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कारकेडीसीसी बँक कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांचा व्याजाचा भार उचलणार

जाहिरात

 

कोरे पॉलिटेक्निक येथे विद्यार्थी परिचय व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात

schedule01 Aug 26 person by visibility 133 categoryशैक्षणिक

वारणानगर : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक), वारणानगर येथे प्रथम वर्षाच्या नवागत विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी परिचय व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना वारणा शिक्षण संकुलाची वाटचाल, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध संधींची माहिती दिली. त्यांनी नवागत विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन, नावीन्यपूर्ण विचार आणि शिस्तबद्ध शिक्षणाच्या माध्यमातून यशस्वी अभियंता होण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी कै. तात्यासाहेब कोरे यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. या माहितीपटातून त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाची, वारणा सहकार चळवळीतील योगदानाची तसेच शिक्षण क्षेत्रातील कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

पाच दिवसांच्या या कार्यक्रमामध्ये मानवी मूल्ये व व्यावसायिक नीतिमत्ता या विषयावरील विशेष व्याख्यान, प्रश्नमंजुषा व विविध उपक्रम, महाविद्यालयातील विविध समिती व विभागांची माहिती, विज्ञान उद्यान व आदर्श प्रयोगशाळा भेट, विभागीय भेट, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन तसेच पन्हाळा किल्ल्याची ऐतिहासिक शैक्षणिक सहल अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

प्राचार्य प्रा. पी. आर. पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभियंता म्हणून आवश्यक असलेले गुण, शैक्षणिक शिस्त व करिअरच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच सल्लागार  डॉ. पी. एम. पाटील यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात कौशल्यविकास, नवोपक्रम आणि स्पर्धात्मक तयारीचे महत्त्व अधोरेखित करून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.

कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन शैक्षणिक समन्वयक प्रा. एस. व्ही. सुर्वे व प्रवेश समन्वयक प्रा. ए. एन. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. ए. व्ही. पाटील यांनी केले.

नवागत विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरणाशी परिचित करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, मूल्याधिष्ठित शिक्षणाची जाणीव तसेच यशस्वी करिअरसाठी आवश्यक प्रेरणा निर्माण करण्याच्या दृष्टीने हा विद्यार्थी परिचय व मार्गदर्शन कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes