केआयटी ला आयएसटीई चा ‘बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मिंग इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट’ हा पुरस्कार प्राप्त
schedule11 Mar 25 person by visibility 319 categoryशैक्षणिक

🔵 सर्वसमावेशक शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर पुरस्काराला गवसणी
कोल्हापूर : येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाला २४ चा आयएसटीई चा राष्ट्रीय स्तरावरील भारतीय विद्या भवन बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मिंग इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट हा पुरस्कार प्राप्त झाला.
महाविद्यालयाच्या एकूण क्षमते पैकी झालेले एकूण प्रवेश, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, शैक्षणिक निकाल,विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट, प्लेसमेंट साठी राबविले गेलेले विविध उपक्रम,संशोधन, रिसर्च कन्सल्टन्सी विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी मिळवलेले यश, विविध प्रोफेशनल सोसायटीचे आयोजित केलेले विविध उपक्रम, आयोजित केलेले विविध सेमिनार ,कॉन्फरन्सेस, राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरून मिळालेले शासकीय किंवा अशासकीय मिळालेले आर्थिक सहकार्य अशा विविध मापदंड या पुरस्कारासाठी निश्चित केले होते. राष्ट्रीय स्तरावरील समितीने या सर्वांचा अभ्यास करून या पुरस्कारासाठी केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाची निवड केली गेली आहे.
केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाने पुन्हा एकदा आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करून हा पुरस्कार प्राप्त केलेला आहे असे मनोगत संचालक मोहन वनरोट्टी यांनी व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले, अन्य विश्वस्त यांनी या यशाबद्दल केआयटी चे सर्व अधिष्ठाता, विभाग प्रमुख,प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.