केआयटीमध्ये गुरूवारी शाश्वत शेतीविषयी व्याख्यान
schedule11 Mar 25 person by visibility 230 categoryशैक्षणिक

या वर्षी बिद्री येथील दूधसाखर महाविद्यालयाचे डॉ. नेताजी पाटील यांचे ‘शाश्वत शेती- ग्रामीण विकासाचा पाया’ या विषयावर व्याख्यान होईल. विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर अध्यक्षस्थानी असतील. यावेळी संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उद्योगभूषण कै. शिवाजीराव देसाई प्रतिष्ठानच्या अध्यक्ष श्रीमती शशीताई देसाई प्रमुख उपस्थित असतील.
केआयटीचे संस्थापक अध्यक्ष कै. शिवाजीराव देसाई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित ही व्याख्यानमाला गुरूवारी दुपारी ३.३० वाजता केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुख्य सेमिनार हॉलमध्ये होईल. परिसरातील उद्योजक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि शाश्वत शेती या विषयात रस असणाऱ्या नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि केआयटीचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी केले आहे.