केआयटीच्या ‘अभिग्यान -२५’ मधून तरुणाईला मिळणार विचारांचे सोने; ‘वॉक विथ द वर्ल्ड’ या विद्यार्थी व्यासपीठाच्या माध्यमातून आयोजन
schedule07 Nov 25 person by visibility 89 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : आज देशभरामध्ये परदेशात अनेक व्यक्ती देशाच्या, समाजाच्या हितासाठी विकासासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देत आहेत. अशा क्रियाशील व्यक्तींचा तरुण पिढी बरोबर संवाद व्हावा व या संवादातून तरुण पिढीला काही दिशादर्शन, मार्गदर्शन व्हावे या हेतूने अभिग्यान या उपक्रमाची सुरुवात केआयटी मध्ये झाली.आजपर्यंत देशातील विदेशातील ६२ मान्यवर या मंचावरती विद्यार्थ्यांना त्यांच्या कामाने वाणीने व कर्तुत्वाने प्रोत्साहित करून गेलेले आहेत. किमान दहा हजार विद्यार्थी या उपक्रमात आजवर थेट सहभागी झालेले आहे
केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या ‘वॉक विथ द वर्ल्ड’ या विद्यार्थी व्यासपीठाच्या माध्यमातून गेली १२ वर्षे ‘अभिग्यान’ हा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा उपक्रम सुरू आहे. तंत्रज्ञान, सुरक्षा, कला, क्रीडा, समाजकारण, साहित्य या विषयात तरुणाईच्या खऱ्याखुऱ्या आयकॉन असणाऱ्या दिग्गजांना आमंत्रित केले आहे. या वर्षीच्या १३ व्या अभिग्यान मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी येणार आहेत भारताचे निवृत्त लेफ्टनंट जनरल श्री.सुदर्शन हसबनीस,आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक लेखक विचारवंत श्री संदीप वासलेकर,संगणक क्षेत्रातील क्विक हिल या अँटिव्हायरसचे सर्वेसर्वा संजय काटकर,AI या क्षेत्रातील तरुण अभ्यासक, ब्लॉगर, लेखक व ब्रोडकास्टर चिन्मय गव्हाणकर ,अभिनय क्षेत्रातील तरुण चेहरा सुप्रसिद्ध चित्रपट कलाकार श्री.अभिनय बेर्डे, मीडिया व पत्रकारीताक्षेत्रातून विलास बढे.
अभिग्यान २०२५ रविवार ९ नोव्हेंबर २०२५ रोजी कोल्हापुरातील आनंद भवन, सायबर महाविद्यालय शिवाजी विद्यापीठ रोड येथे सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत संपन्न होणार आहे.
या पत्रकार परिषदेत संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी, वॉक विथ वर्ल्ड चे समन्वयक प्रा.अमर टिकोळे, सह-समन्वयक प्रा.प्रसाद जाधव, व्यासपीठाचे विद्यार्थी पदाधिकारी आदित्य साळोखे आणि समीक्षा बुधले उपस्थित होते.
या उपक्रमात कोल्हापुरातील तरुणाईने, तसेच व्यावसायिक, विचारवंतांनी उस्फुर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन केआयटीचे संचालक,विश्वस्त व वॉक विथ द वर्ल्ड च्या संयोजकांनी केले आहे.