SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
निकालानंतर 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची मोफत सेवाडीकेटीईच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्नीकमध्ये एआयएमएल व मेकॅट्रॉनिक्स पदविका अभ्यासक्रमांना एआयसीटीई, दिल्लीकडून मान्यता; दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांस सुवर्णसंधीभारतीय सशस्त्र दलांचा ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईकरोटरी सेंट्रलचे मिस चायवाली शिवानीच्या स्वप्नांना पाठबळडी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा एज्युलाईन्स कन्सलटंटशी सामंजस्य करारकळंबा येथे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी, अंबाबाई देवीच्या उत्सवानिमित्त आजपासून विविध कार्यक्रमाचे आयोजनसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे भारतीय लोकशाहीला मिळाला न्याय, महायुतीला पुन्हा मिळणार निर्विवाद जनाधार, खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वासलोकशाहीच्या पुन:र्स्थापनेसाठी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : आमदार सतेज पाटील1445.97 कोटी रुपयांच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यास व 259.59 कोटी रुपयांच्या श्री जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरीराजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

जाहिरात

 

कोल्हापूर : घरफाळा थकबाकी पोटी महाव्दार रोड येथील व्यापारी संकुलातील 3 गाळे सिल

schedule18 Dec 24 person by visibility 304 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका कर आकारणी व वसुली (घरफाळा) विभागाच्या वतीने शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना जप्ती नोटीस लागु करण्यात आल्या आहेत. यामधील ज्या मिळकतधारकांनी थकीत रक्कम जमा केली नाही अशा थकबाकीदारांवर कारवाई करुन मिळकती सिल करणेची कार्यवाही सुरु केली आहे. यामध्ये आज महाव्दार रोड येथील बालाजी भवन या व्यापारी संकुलातील 3 गाळेधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई विभागीय कार्यालय क्र.1, गांधी मैदान येथील घरफाळा विभागाकडून करण्यात आली. यामध्ये करदाता क्रमांक 31161 दिलीप जोतीराव पाटील यांची रक्कम रु. 1 लाख 70 हजार 52 रुपये, करदाता क्रमांक 31158 दिलीप जोतीराव पाटील रक्कम यांची रु. 82 हजार 276 रुपये, करदाता क्रमांक 30931 दिलीप जोतीराव पाटील यांची रक्कम रु. 2 लाख 27 हजार 496 रुपये असे या तीन मिळकतींची एकूण रक्कम रु. 4 लाख 79 हजार 824 रुपये इतकी थकबाकी आहे. त्यामुळे हे तीन गाळे आज सील करण्यात आले आहेत.

तरी शहरातील सर्व थकबाकीदारांना पुन:श्च एकदा जाहीर आवाहन करण्यात येते की ज्यांनी अद्यापही आपल्या घरफाळ्याची थकीत रक्कम भरणा केलेली नाही त्यांनी आपला थकीत घरफाळा लवकरात लवकर भरुन महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

 अन्यथा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतूदी नुसार सदरची मिळकत सील किंवा मिळकतीवर बोजा नोंद करण्याची कारवाई करण्यात येईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes