SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
उखळु धबधबा पर्यटकांसाठी पर्वणी; हिरवागर्द निसर्गसौंदर्याची पर्यटकांना साद...कोल्हापूर : राजारामपुरी व स्टेशन रोड परिसरातील अनधिकृत हातगाड्या, शेड व स्टँड बोर्ड जप्तबदल स्विकारुन माध्यमांचे महत्व वृध्दिंगत करुया…!; कोल्हापूरच्या पत्रकार कार्यशाळेतील सूरकोल्हापुरात सार्वजनिक ठिकाणी आढळणारी तीन जनावरे जप्तकेशवराव भोसले नाट्यगृह पुर्नबांधणी कामाची नुतन अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांची पाहणीडॉ. जब्बार पटेल यांचा उद्या विद्यापीठात मुक्त संवादपन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदचे 'सुपर स्वच्छ लीग' मध्ये देशपातळीवर यश; राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवसहकार मजबुतीकरणासाठी गोकुळला सर्वतोपरी सहकार्य : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळडी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या ४२ विद्यार्थ्यांची विविध कंपनीत निवडखडकी येथे 4 ऑगस्टपासून अग्निवीर भरती

जाहिरात

 

कोल्हापूर : राजारामपुरी व स्टेशन रोड परिसरातील अनधिकृत हातगाड्या, शेड व स्टँड बोर्ड जप्त

schedule17 Jul 25 person by visibility 277 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज राजारामपुरी मेन रोडवरील जनता बाजार चौक ते रेल्वे फाटक रोड या मार्गावरील अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 10 हातगाड्या, 2 पत्र्याचे शेड/छपऱ्या, 17 स्टँड बोर्ड विना परवाना अनधिकृत स्वरूपात आढळून आले. यामध्ये रेल्वे फाटक परिसरातील 4 हातगाड्या जप्त करण्यात आल्या. तर 6 हातगाड्या फेरीवाल्यांनी स्वतःहून हटविल्या. 

ही कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त स्वाती दुधाणे, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आणण्यात आली.

ही कारवाई अतिक्रमण अधीक्षक विलास साळोखे, सहायक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, मुकादम रविंद्र कांबळे, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, राजारामपुरी व गांधी मैदान वॉर्डातील कर्मचारी व पोलिस कर्मचा-यांनी केली. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत पुढील काळात देखील शहरातील अनधिकृत फेरीवाले, दुकानदारांकडून रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या शेड्स व स्टँड बोर्ड यांच्यावर सातत्याने कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे अनधिकृत फेरीवालयांनी आपली अतिक्रमण हटवून सहकार्य करावे. दुकानाबाहेरील पार्किंग जागांवर स्टँड बोर्ड लावू नयेत, अन्यथा ते जप्त करण्यात येतील अशा सूचना महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत करण्यात आल्या आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes