SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्रचारसाहित्य, फलक लवकरात लवकर काढण्याची कार्यवाही करण्याचे विभागीय आयुक्तांचे निवडणूक प्रशासनाला निर्देशकोल्हापूर महानगरपालिका: प्रभाग समित्यांच्या कामकाजाला मिळणार नवी गतिमानता!विद्यापीठाच्या काळसेकर पुरस्कारांचे २९ सप्टेंबरला वितरणगणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांनी वाहन व कागदपत्रांची तपासणी करुन घ्यावीप्रवाशांच्या खिशावर दरोडा? एसटी-खासगी बसचालक मनमानी भाडे आकारल्यास आता थेट कारवाई; आरटीओचा कडक इशारा!वारणा विद्यापीठात २९ सप्टेंबरला ‘मेगा जॉब फेअर आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन: संवादाच्या नव्या युगाचा पायागोकुळ दूध संघ निवडणूक: २५ जागांसाठी तब्बल ३०१ उमेदवारांचे अर्ज दाखल; आजी-माजी दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल!कोल्हापूर महानगरपालिका : 39 स्वच्छता कर्मचाऱ्यांवर 500 रुपयांची तर 1 मुकादमवर 2000 रुपयांची दंडात्मक कारवाईसार्वजनिक गणपती विसर्जनासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्ज

जाहिरात

 

कोल्हापुरात मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या महिलांना चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने सोन्याचे दागीने चोरणारी टोळी गजाआड

schedule13 Sep 25 person by visibility 583 categoryगुन्हे

कोल्हापूर  : कोल्हापुरात मॉर्निंग वॉकसाठी  जाणाऱ्या महिलांना चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने सोन्याचे दागीने चोरणारी टोळीला अटक करण्यात आले. त्यांच्याकडून 35.270 ग्रॅम सोन्याचे दागीन्यासह 4,60,000/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण कोल्हापूर शाखेने केली.

गेले काही दिवसापासून सुनसान परिसरात मॉर्निंग वॉक करीता जाणारे महिलांना टार्गेट करून तीन अनोळखी तरुण मोटर सायकलवरून येवून महिलांना चाकूचा धाक दाखवून त्यांचे गळयातील सोन्याचे दागीने जबरदस्तीने चोरणेचे लागोपाठ एका आठवडयात सुमारे चार ठिकाणी गुन्हे घडले. सदरबाबत करवीर व राजारामपूरी पोलीस ठाणेस गुन्हे दाखल झाले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरील अधिकारी व अंमलदार यानी नमुद गुन्हे घडले ठिकाणी पाचगांव, गिरगांव, आर. के. नगर, मोरेवाडी व शांतीनकेतन या सर्व ठिकाणी भेटी देवून सदर परिसरातील सुमारे 100 ते 125 ठिकाणचे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे पाहीले. तसेच सदर परिसरातून माहिती घेवून व फिर्यादी यांना समक्ष भेटून सी सी टी व्ही कॅमेरामध्ये प्राप्त झालेले संशयीत इसमांचे फोटो दाखवुन फिर्यादी व साक्षीदार यांचेकडुन आरोपीबाबत खात्री करुन घेतली व गुन्हयाचा तपास सुरु केला. आरोपी ज्या मोटर सायकल वरून चोरी करून पळुन गेले होते त्याचा सीसीटीव्ही कॅमे-याचे आधारे शोध असताना ते हॉकी स्टेडियम या ठिकाणी त्यांचेकडील मोटर सायकलवरून आलेले दिसुन आले. त्याठिकाणी पथकाने त्याचा सीसीटीव्ही मधील चित्रीकरण येणा-या जाणा-या तसेच स्थानिक लोकांना दाखवुन त्याचा शोध सुरु केला.

तपास करीत असताना पोलीस पथकाने प्राप्त झालेले सीसीटीव्ही चित्रीकरण दाखलविल्यानंतर गोपनिया बातमीदाराने सदरचे चोर हे रामानंद नगर बालाजी पार्क येथील असलेबाबत खात्रीशिर माहिती दिली. त्यानंतर पोलीस पथकाने बालाजी पार्क, हॉकी स्टेडीयम, रामानंदनगर जाणारे रोडवर सापळा रचला असता हॉकी स्टेडीयमकडून सायबर चौकाकडे जाणारे रोडवर आयसोलेशन हॉस्पीटल समोर सी.सी.टी.व्ही. चित्रीकरणातील इसम दिसुन आला. त्यास पोलीस पथकाने ताब्यात घेतले व त्यास नांव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव  श्रेयस तुकाराम खाडे, वय 19, रा. रामानंदनगर जरगनगर रोड कोल्हापूर असे असलेचे सांगीतले. त्यावेळी त्याचेकडे कसुन चौकशी असता त्याने व त्याचे दोन मित्र (अल्पवयीन) यांनी चैनीसाठी पैशाची गरज असलेने त्यानी अशा प्रकारे मॉर्निंग वॉक करीता जाणा-या महिलांचे गळयातील दागीने चोरी करण्याचा प्लॅन तयार केला व त्यानुसार गिरगाव घाटामध्ये दोन महिलांना अडवुन एका महिलेला चाकुचा धाक दाखवुन तीचे मंगळसुत्र चोरी केले त्यानंतर दोन दिवसापुर्वी खडीचा गणपती येथे व शांतिनिकेतन शाळेच्या समोर पहाटे फिरणेकरीता जाणारे महिलांचे गळयातील सोन्याचे दागीने जबरदस्तीने चोरी केलेची कबुली दिली.


आरोपी श्रेयस तुकाराम खाडे याचे कब्जातून 35.270 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीन, इतर साहित्य व गुन्हा करणेकरीता वापरलेली मोटर सायकल असा एकूण 4,60,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच आरोपी श्रेयस खाडे याचे इतर दोन अल्पवयीन साथीदार यांनाही ताब्यात घेतले आहेत. आरोपी श्रेयस तुकाराम खाडे याने व त्याचे साथीदारानी केलेले जबरी चोरीचे एकूण 03 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक, योगेश कुमार ,  अपर पोलीस अधीक्षक  डॉ. बी धीरज कुमार, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक  सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, हिंदुराव केसरे, गजानन गुरव, रुपेश माने, रोहीत मर्दाने, संतोष बरगे, अरविंद पाटील, संजय हुंबे, अशोक पवार, अमित सर्जे, दिपक घोरपडे, प्रविण पाटील, वैभव पाटील, विशाल खराडे, वसंत पिंगळे, संदीप पाटील, निवृत्ती माळी, संजय पडवळ, नवनाथ कदम, सतिश सुर्यवंशी, राजेंद्र वरंडेकर तसेच करवीर पोलीस ठाणेकडील सुजय दावणे, विजय तळसकर, प्रकाश कांबळे, योगेश शिंदे, अमित जाधव, रणजित पाटील, सुभाष सरवडेकर व राजारामपूरी पोलीस ठाणेकडील विशाल शिरगांवकर, संदिप सावंत, सत्यजित सावंत, कृष्णात पाटील, सचिन पाटील, सुशांत तळप, अमोल पाटील यांनी केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes