कोल्हापूर महापालिकेच्यावतीने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यां व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई
schedule16 Nov 25 person by visibility 78 categoryमहानगरपालिका
▪️महालक्ष्मी इडली सेंटरला एक हजार तर बालाजी गार्डन सांस्कृतिक हॉलला दहा हजार रुपये दंड
कोल्हापूर : शहरातील स्वच्छतेस बाधा आणणारा कचरा उघड्यावर टाकणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिकेच्या पथकामार्फत दंडात्मक कारवाई सुरू आहे.
त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालया समोरील महालक्ष्मी इडली सेंटरनी उघड्यावर कचरा टाकल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना रु.1000/- चा दंड तसेच ताराबाई पार्क येथील बालाजी गार्डन सांस्कृतिक हॉल यांनी बेकायदेशीर रित्या अन्न खरकटे व प्लास्टिक बॉटल्स ड्रेनेज लाईनला सोडले असल्याचे निदर्शनास आल्यामुळे या परिसरात महापालिकेची ड्रेनेज लाईन वारंवार चोकअप होणेसंबधी तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामुळे बालाजी गार्डन सांस्कृतिक हॉल यांना रुपये १०,०००/- रुपयांचा दंड करण्यात आला. तसेच अशा व्यावसायिकांना कचरा उघड्यावर न टाकण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या.
सदरची कारवाई सहा.आयुक्त कृष्णा पाटील, विभागीय आरोग्य निरीक्षक विकास भोसले, आरोग्य निरिक्षक गीता लखन व कर्मचारी यांनी केली.