SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
​३ लाख मतदार प्रक्रियेतून वंचित राहण्याची भीती; सतेज पाटलांचा प्रशासनावर हल्लाबोल!केडीसीसी बँक वार्षिक पतपुरवठा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, पीक कर्ज वाटपामध्ये अग्रस्थानीमाणिक पाटलांच्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; मुंबईत लवकरच बैठक होणार!सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांचा भीषण अपघात; थोडक्यात बचावले!राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्या प्रारंभ खिद्रापूरकरांवर अन्याय होऊ देणार नाही : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरडी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या डॉ. निरांत पाटील यांचा राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात ठसाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठरावसंख्या १,९८२ होणार : जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांचा दावापेपरफुटी'चे महाराष्ट्र मॉडेल: लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा पुन्हा लिलाव, TET परीक्षा रद्द!शाहीर सरसेनापती पुरस्कारांचे उद्या रविवारी वितरण

जाहिरात

 

हातकणंगलेच्या प्रलंबित विकासकामांना करोडो रुपयांचा निधी देण्यासाठी हातकणंगले नगरपंचायतीमध्ये कमळ फुलवा : चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

schedule30 Nov 25 person by visibility 376 categoryराजकीय

कोल्हापूर  : केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार असल्याने हातकणंगले शहराचा विकास करण्यासाठी भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजू इंगवले यांच्यासह भाजपच्या पूर्ण पॅनेलला निवडून द्या आणि हातकणंगले नगरपंचायतीत कमळ फुलवा, असे आवाहन राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. हातकणंगलेमध्ये प्रचार सभेत ते बोलत होते.

हातकणंगले नगरपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू असून भाजपने नगराध्यक्ष उमेदवारासह नगरसेवकांच्या सर्व जागासाठी उमेदवार उभे केले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी हातकंणगले शहरातून प्रचार रॅली काढून सभेला उपस्थिती लावली.  शहराचा सर्वांगीण विकास करण्या बरोबर प्रत्येक कुटुंबाचा विकास झाला पाहिजे. यासाठी भाजपा सरकारनं महिलांसाठी मातृवंदना, मुलींच्या शिक्षणासाठी योजना, जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, लखपती ताई योजना, लाडकी बहिण योजना, एक लाखाचे व्यावसायिक कर्ज, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत १५ लाख रुपये विनाव्याज व्यावसायिक कर्ज, शिक्षण फी माफ, अटल पेन्शन योजना, अशा अनेक योजना शासन राबवते आहे. गावात पाणी योजना आणण्यासाठी ६४ कोटी रुपये लागणार आहेत. रिंगरोडसाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी दोन-अडीचशे कोटी, रस्ते करण्यासाठी  शंभर कोटी लागतील. त्याचबरोबर विकासकामांसाठी करोडो रुपये निधी लागणार आहे. हा निधी विरोधक कोठून आणणार आहेत, याचा विचार मतदारांनी करावा. त्यामुळे जनतेने विरोधकांच्या भुलथापाना बळी पडू नये, असे नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दुरदृष्टीमुळे देशाचा झपाट्याने विकास होतोय. देशाची अर्थव्यवस्था सुधारत आहे. भाजपाने अनेक चांगल्या योजना आणल्या आहेत, त्या लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हातकणंगले नगर पंचायतीत भाजपचेच पॅनेल बहुमताने निवडून द्या, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले. यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर, अरुण इंगवले, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजू इंगवले, मंडल अध्यक्ष शितल हावळे यांनी मनोगत व्यक्त केले. सभेला प्रसाद खोबरे, स्मिता इंगवले, गुंडा इरकर, सरपंच अजिंय इंगवले, अमर इंगवले यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes