कोल्हापूर : येथील महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलचा (म.ल.ग.) दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. हायस्कूल मधील १७९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.
हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांक श्रुती संतोष कांबळे (९४.२० टक्के गुण) द्वितीय क्रमांक आर्या प्रशांत इंगोले (९३.८० टक्के गुण) व रसिका सतीश शिर्वटकर (९३.८० टक्के गुण ) यांनी मिळवला तर तृतीय क्रमांक मधुरा राजेंद्र हुक्किरे (९३.२० टक्के गुण) हिने मिळवला.
मधुरा प्रताप पाटील, मधुरा हुक्कीरे, इंद्रायणी पाटील, साक्षी अतिग्रे, पायल सनगर, आदिती ढेरे, मधु भोगावकर, सानिका चव्हाण, साक्षी सुतार, श्रावणी शिंदे, ऋचा टोपणे, सृष्टी पाटील, ऋतुजा दिंडे, बुशरा काझी, अनुजा गुरव, ऋचा ललित, तनिषा नलवडे सिद्धी काटकर, संजना खराडे, सिद्धी मोरे, या विद्यार्थिनीनी हायस्कूलमध्ये ८६ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले आहेत.