SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिलपंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्याने आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांची पंपिंग स्टेशनला भेट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनाकोल्हापूर : महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईएमसीईडीमार्फत 'उद्योजकता विकास प्रशिक्षण'चे आयोजनडीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवडकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधकोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरीअहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधवद्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

जाहिरात

 

एमपीएससी गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 53 केंद्रावर सुरळीत

schedule04 Jan 26 person by visibility 346 categoryराज्य

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांचेमार्फत आयोजित महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा–2025 ही परीक्षा रविवार, दि. 4 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत एका सत्रात पार पडली. जिल्ह्यातील महाविद्यालये व हायस्कूलमधील एकूण 53 उपकेंद्रांवर ही लेखी परीक्षा घेण्यात आली.

या परीक्षेसाठी एकूण 16 हजार 313 परीक्षार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी 12 हजार 666 परीक्षार्थी उपस्थित, तर 3 हजार 647 परीक्षार्थी अनुपस्थित होते.

परीक्षा कामकाजासाठी जिल्हाधिकारी तथा कोल्हापूर जिल्हा केंद्र प्रमुख, निवासी उपजिल्हाधिकारी तथा परीक्षा नियंत्रक, राज्यकर उपायुक्त, जीएसटी भवन कोल्हापूर (विशेष निरीक्षक) यांच्यासह अभिरक्षक, अतिरिक्त अभिरक्षक, सहाय्यक अभिरक्षक व परीक्षा नियंत्रक सहाय्यक यांची नियुक्ती करण्यात आली होती.

परीक्षा व्यवस्थापनासाठी समन्वय अधिकारी – 14, समवेक्षक – 789, समन्वय सहाय्यक कर्मचारी – 14, लिपिक – 106, भरारी पथक अधिकारी – 3, केटरटेकर – 53, भरारी पथक सहाय्यक कर्मचारी – 3, शिपाई कर्मचारी – 430, उपकेंद्रप्रमुख – 53, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी – 12 तसेच पर्यवेक्षक – 238 अशी एकूण मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली होती. परीक्षा केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक परीक्षार्थीची बायोमेट्रिक पडताळणी व स्क्रीनिंग करण्यात आले. तसेच प्रत्येक परीक्षा कक्षामध्ये CCTV कॅमेरे बसविण्यात आले होते.

शहरातील सर्व 53 परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडली असून कोणताही अनुचित प्रकार किंवा अनियमितता घडलेली नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा परीक्षा नियंत्रक कोल्हापूर गजानन गुरव यांनी दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes