माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांची घेतली सदिच्छा भेट
schedule29 Apr 23 person by visibility 352 categoryसामाजिक

🟫 राजाराम कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीतील सहकार्याबद्दल आभार व्यक्त
वारणानगर : येथे आज वारणानगर (जनसंपर्क कार्यालय) येथे माजी आमदार महादेवराव महाडिक व माजी आमदार अमल महादेवराव महाडिक यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांची सदिच्छा भेट घेऊन श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीतील सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत 'छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीने दणदणीत विजय संपादन केला. या निवडणुकीमध्ये आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी केलेल्या सहकार्यामुळेच हा विजय प्राप्त झाला असल्याचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील,वडगांव शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे नूतन संचालक शिवाजीराव पाटील, शंकरराव पाटील,उत्तमराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.