SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सोलापुरात कौस्तुभ गावडे यांची प्रचारात आघाडी; कौस्तुभ गावडे यांना शिक्षक आणि शिक्षण संस्थांचा वाढता पाठिंबा!पात्र शाळा व वाढीव तुकड्यांना वेळेत अनुदान मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार; सर्व पात्र संस्थांना १००% पूर्ण अनुदान मिळावे यासाठी आग्रही राहणार : शिक्षकमित्र कौस्तुभ गावडेशारंगधर देशमुख यांच्या सोबतीने महायुती मजबूत : चंद्रकांतदादा पाटीलखासगी रुग्णालयांना सेवा-सुविधांचे दर ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारककर्करुग्णांसाठी मोठा दिलासा विस्तारित महात्मा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत PET-CT स्कॅनचा समावेशपदवीधर, शिक्षक उमेदवारांच्या प्रचारासाठी चंद्रकांतदादा पाटील यांचा घरोघरी संपर्ककौशल्यातूनच जागतिक नेतृत्व शक्य : प्रा. डॉ. भीमराया मेत्री३१ ऑक्टोबरपर्यंत थकीत मुद्दल न भरल्यास ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा खंडित करणारगरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस: कारण, महत्त्व आणि संकल्पप्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्र.3 राजारामपुरी व केंद्र क्रं.4 पंचगंगा या आरोग्य संस्था गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम अंतर्गत राज्यस्तरीय मानांकनास पात्र

जाहिरात

 

शारंगधर देशमुख यांच्या सोबतीने महायुती मजबूत : चंद्रकांतदादा पाटील

schedule17 Oct 26 person by visibility 243 categoryराजकीय

◼️पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत महायुतीचेच उमेदवार विजयी होतील : शारंगधर देशमुख
◼️चंद्रकांतदादा पाटील यांचा वसंतराव देशमुख हायस्कूलमधील शिक्षकांशी संवाद

कोल्हापूर :  शारंगधर देशमुख यांच्यासारखे नेतृत्व महायुतीसोबत आल्याने महायुती अधिक मजबूत झाली आहे, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत महायुतीचेच उमेदवार विजयी होतील, असा विश्वास शिवसेनेचे गटनेते व नगरसेवक सारंगधर देशमुख यांनी व्यक्त केला.

पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरातील श्री लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री वसंतराव जयंतराव देशमुख हायस्कूलला भेट दिली. यावेळी त्यांनी शिक्षकांशी संवाद साधला.

यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे गटनेते व नगरसेवक सारंगधर देशमुख, संस्थेच्या अध्यक्षा सुमन देशमुख, राहुल चिकोडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “स्वर्गीय वसंतराव देशमुख यांच्याशी माझे जुने स्नेहाचे संबंध होते. पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करत असताना विविध विषयांवर त्यांच्याशी अनेकदा संवाद व्हायचा. महायुती सरकारच्या काळात पदवीधर आणि शिक्षकांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहे.”

ते पुढे म्हणाले की, महापालिका निवडणुकीपासून शारंगधर देशमुख यांच्यासारखे नेतृत्व महायुतीसोबत आल्याने युतीला अधिक बळ मिळाले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता जाधव, तर शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे हे भाजप-महायुतीचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक प्राधान्यक्रम पद्धतीने होत असल्याने दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित शिक्षकांना केले.

संस्थेचे सचिव आणि शिवसेनेचे गटनेते व नगरसेवक शारंगधर देशमुख म्हणाले की, संस्थेला अडचणीच्या काळात चंद्रकांतदादांनी नेहमीच मदत केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी संस्थेतील प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes