SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मधुमेहग्रस्त सात वर्षांच्या साक्षी वर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रियाकेंद्रीय सहकार खात्याचे अ‍ॅडिशनल सेक्रेटरी पंकज कुमार बन्सल यांची कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास भेटमतदान केंद्रावरील ३२४५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण यशस्वीप्रयत्नांच्या जोरावर यशाचे शिखर गाठा : माजी प्राचार्य विजय डोणे आठवणींना उजाळा, मैत्रीला नवा श्वास : कोरे; अभियांत्रिकी २००० बॅचचा रौप्यमहोत्सवसेंट्रल पार्कची कामे गतीने पूर्ण करा : उपमुख्यमंत्री अजित पवार; उपमुख्यमंत्र्यांकडून शहरातील विकासकामांची पाहणीशिवाजी विद्यापीठात दि. ३० डिसेंबर रोजी ‘संत साहित्य संमेलन’नवीन शैक्षणिक धोरण व शारीरिक शिक्षण आरोग्य याचे महत्त्व : ✍️ डॉ अजितकुमार पाटील, कोल्हापूरगडचिरोली पोलीस दलाच्या बळकटीसाठी 34 नव्या वाहनांचा ताफा दाखलश्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तीन महिन्याकरिता बंद

जाहिरात

 

होमगार्ड भरतीच्या मैदानी चाचणीसाठी पुरुष व महिला उमेदवारांनी उपस्थित रहावे : अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई

schedule12 Sep 24 person by visibility 731 categoryराज्य

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याकरिता होमगार्ड पुरुष व महिलांचा अनुशेष, रिक्त जागा भरण्याबाबत ऑनलाईन प्रणालीतुन https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php अन्वये दि. 26 जुलै 2024 ते दि. 14 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते, त्यानुसार पुरुष व महिला यांच्या प्राप्त अर्जाप्रमाणे मुळ कागदपत्र तपासणी व मैदानी चाचणी दिनांक 24 ते 26 सप्टेंबर 2024 पर्यंत पोलीस कवायत मैदान, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज रजिस्टर क्रमांका प्रमाणे व नमुद तारखेस वेळेत मुळ कागदपत्रे व त्याच्या 2-2 छायांकित प्रती कागदपत्रे व 4 कलर आयडेंटी साईज फोटो सहित उपस्थित रहावे, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक तथा होमगार्डच्या जिल्हा समादेशक जयश्री देसाई यांनी केले आहे. 

दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6 ते सकाळी 10, महिला, अर्ज नोंदणी क्र. 8 ते 9746 सर्व महिला असे एकूण 1163 तर दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6 ते सकाळी 10.30, पुरुष, अर्ज नोंदणी क्र. 1 ते 2410 असे एकूण 2137, दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6 ते सकाळी 10.30, पुरुष, अर्ज नोंदणी क्र. 2411 ते 6141 असे एकूण 3300 व दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6 ते सकाळी 10.30, पुरुष, अर्ज नोंदणी क्र. 6143 ते 9747असे एकूण 3219 याप्रमाणे उमेदवारांनी उपस्थित रहायचे आहे.   

 नियोजित तारखेस काही अपरिहार्य कारणास्तव बदल झाल्यास त्याबाबत पुढील तारीख त्या-त्या उमेदवारांना कळविण्यात येईल. उमेदवारांनी वरील नमुद वेळेत नोंदणी प्रक्रियेकरिता उपस्थित राहणे बंधनकारक आहे. नमुद वेळेनंतर उपस्थित राहणा-या उमेदवारांना नोंदणी प्रक्रियेकरिता प्रवेश दिला जाणार नाही, असेही श्रीमती देसाई यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes