SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यातील २९ हजार कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होणार; शासकीय जमिनीवरील २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल होणारराधानगरी तालुक्यातील अवसायनात संस्थांच्या सुनावणीस गती द्या : अभिजीत तायशेटे, संचालक, गोकुळ दूध संघ कोल्हापूर येथील नियोजित फिश मार्केटला आवश्यक मदत व निधी देऊ : मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेकोल्हापूर भूमी अभिलेख झाले ‘हायटेक’; ३ कोटी ६९ लाखांच्या आधुनिक यंत्रसामग्रीचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरणदीड वर्षांपासून रखडले काम; उचगाव-गडमुडशिंगी रस्त्यासाठी शिवसेना मैदानात!महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर; सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव आदी जिल्ह्याचा समावेश भारतीय हवाई दलाचे ‘फ्लाईट सिम्युलेटर’ बनले विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू; केआयटी मध्ये भारतीय वायुदलाचा विशेष जनजागृती कार्यक्रमजागतिक कला व वारसा दिनानिमित्त विद्यापीठात ‘रंग कुंचल्याचे’ स्पर्धामहात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या अनुबंधाविषयी शिवाजी विद्यापीठात गुरूवारी चर्चासत्रडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजन

जाहिरात

 

मनोहर जोशी यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान

schedule25 Jul 25 person by visibility 502 categoryउद्योग

इचलकरंजी : साखर उद्योगातील चार दशकाहून अधिक कामकाजाच्या दीर्घकालीन आणि उल्लेखनीय योगदानाची दखल घेत शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या वतीने हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार नवीदिल्ली येथील कार्यक्रमात नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज् लि; नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

नवीदिल्ली येथील भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटर येथे संस्थेचे वार्षिक अधिवेशन आणि आंतरराष्ट्रीय साखर प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष संजय अवस्थी, कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे, सौ. किशोरी आवाडे, व्हा. चेअरमन बाबासो चौगुले, कारखान्याचे अधिकारी तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणेचे महासंचालक संभाजी कडू-पाटील, नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टर डॉ. सीमा परोहा, डीसीएम श्रीरामचे सीईओ आर. एल. तमक, उद्योगपती रणजित पुरी, महाराष्ट्राचे माजी मंत्री जयंत पाटील, नॅशनल फेडरेशनचे संचालक अनित कोरे, साखर उद्योगातील विविध तज्ञ, अभ्यासू मान्यवर उपस्थित होते.

यावर्षी शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्था आपली शताब्दी साजरी करत असून अशा ऐतिहासिकप्रसंगी हा पुरस्कार मिळणे ही कारखान्यासाठी एक अत्यंत गौरवास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे. संस्थेची स्थापना 1925 साली झाली असून गेल्या 100 वर्षांपासून ही संस्था साखर उद्योगाच्या तांत्रिक प्रगतीसाठी कार्यरत आहे. साखर उत्पादन, प्रक्रिया, ऊर्जा कार्यक्षमता, पर्यावरणीय शाश्‍वतता यासारख्या विविध क्षेत्रांत मार्गदर्शनपर कार्यशाळा, संशोधन परिषद आणि प्रकाशने यांद्वारे साखर उद्योगाला दिशा देत आहे.


मनोहर जोशी यांनी सहकारी साखर उद्योग, सहकारी बँकिंग व ऊर्जा कार्यक्षमतेच्या क्षेत्रांत चार दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय योगदान दिले आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघ नवीदिल्ली येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण व्यवस्थापकीय काम पाहिलेले आहे. त्यांच्या या कार्यामुळे साखर उद्योगाला नवी दिशा व ऊर्जा मिळाली आहे. या यशामागे कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, व्हाईस चेअरमन बाबासाो चौगुले तसेच सर्व संचालक मंडळ व सभासद-शेतकरी आणि अधिकारी-कर्मचार्‍यांचे मोलाचे सहकार्य व प्रेरणा लाभली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes