SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी वाय पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांची ‘एमएएस’कडून यंग असोसिएट व फेलो म्हणून निवडइंडिया आघाडीच्या वतीने उद्या रविवारी बिंदू चौक येथे केंद्रीय गृहमंत्र्यांचा निषेध‘आविष्कार’मध्ये पदव्युत्तर संशोधकांकडून १९१ प्रकल्पांचे सादरीकरण; पदवीस्तरीय आणि पीएचडी संशोधन स्तरीय सादरीकरण स्पर्धेचा गटनिहाय निकालनाम. मुश्रीफ, नाम.आबिटकर यांनी दिली गोकुळचे चेअरमन डोंगळे यांच्या घरी सदिच्छा भेट; डोंगळे कुटुंबियांकडून दोन्ही मंत्र्यांचा सत्कारनूतन मंत्री हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर यांचे विमानतळावर स्वागतकरवीर नगरीमध्ये कॅबिनेट मंत्री मुश्रीफ, आबिटकर यांचे जोरदार स्वागतबीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस'बांधावरची झाडे’ निसर्गाकडे पाहण्याचा सद्भाव निर्माण करणारे: डॉ. नंदकुमार मोरे; डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्या पुस्तकाचे विद्यापीठात प्रकाशनरोजगार हमी योजनेतील मजुरांच्या खात्यात 2 हजार 856 कोटी रुपये जमासंपुर्ण कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा सोमवारी राहणार बंद...

जाहिरात

 

यशस्वी होण्यासाठी कौशल्ये आत्मसात करा: संदीप पाटील; कोरे अभियांत्रिकीत प्रथम वर्षाचे उत्साहात स्वागत

schedule12 Sep 24 person by visibility 319 categoryशैक्षणिक

वारणानगर : आयुष्यात यशस्वी होण्यासाठी फक्त लेखी गुणांकडे लक्ष न देता प्रात्यक्षिक व कौशल्य आत्मसात करण्यावर भर द्या असे मत संदीप पाटील, नॅशनल सायबर टेक लीगल एक्सपर्ट, यांनी व्यक्त केले. निमित्त होते तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस) महाविद्यालय आयोजित अभियांत्रिकी एमबीए एमसीए मध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे. संदीप पाटील हे यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे केमिस्ट्री विषयाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी सायबर सिक्युरिटी मध्ये भारतात पहिली पीएचडी करत असल्याचे नमूद केले. त्यांनी सहकार महर्षी श्री तात्यासाहेब कोरे यांचे उदाहरण देऊन पटवून सांगितले की कमी शिक्षण असून सुद्धा यशाची शिखरे गाठता येतात.

सन २०२४-२५ मध्ये प्रथम वर्ष विभागामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले व स्टुडंट ओरिएंटेशन प्रोग्रामचे उद्घाटन करण्यात आले.

 यावेळी १६०० पेक्षा जास्त विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीने पूर्ण परिसर बहरून गेला. कार्यक्रमाच्या सुरवातीला गेल्या वर्षातील परीक्षेत झळकलेल्या ०५ गुणवंतांचा आणि नवीन प्रवेश घेतलेल्या सीईटी परीक्षेत अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी काही पालकांनी महाविद्यालयाचे प्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे प्रमुख डॉ. विनयरावजी कोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाचे विशेष अतिथी राजेश देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, लायरा नेटवर्क एशिया यांनी सांगितले की भारताचे यूपीआय सेवा फ्रान्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करू शकलो याची सगळे श्रेय तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात मिळालेल्या शिक्षणाला व अभ्यासेतर उपक्रमाना दिले. राजेश देसाई हे सध्या एक नावाजलेले यशस्वी उद्योजक असून त्यांनी तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी वारणानगर येथून इलेक्ट्रॉनिक्स शाखेतून १९९३ साली पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, यांनी वारणा विद्यापीठाची व भविष्यात होऊ घातलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच तसेच हे विद्यापीठ स्टेट पब्लिक क्लस्टर युनिव्हर्सिटी असून सर्व शासकीय नियमानुसार चालणार असल्याची सांगितले. 

प्र. प्राचार्य, डॉ. डी. एन. माने यांनी स्टुडन्ट इंडक्शन प्रोग्रॅम चे महत्त्व सांगितले व महाविद्यालयातील इतर सेल विषयी माहिती दिली. जोशी झांफला कंपनीचे पीएमओ अग्रण्या झंपाला यांनीही मार्गदर्शन केले.

अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे यांनी आयडिया लॅब, ॲपल ट्रेनिंग सेंटर व महाविद्यालयात सुरू असलेल्या आणि भविष्यात होणाऱ्या उपक्रमांची माहिती पुरवली. विभाग प्रमुख डॉ. पी . जे.पाटील यांनी विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 

ऍडमिशन इन्चार्ज, डॉ. ए. व्ही. पाटील यांनी प्रवेशाशी निगडीत औपचारिक गोष्टीची माहिती करून दिली. डॉ. मार्क मोनिस, प्रा. गणेश कांबळे व कृष्णात पाटील यांनी मुख्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ.व्ही. डी.पाटील यांनी आभार मानले. यावेळी वारणा विद्यापीठाचे डायरेक्टर्स, सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes