SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञानासोबत संवाद कौशल्ये विकसित करावीत : अकिब शेखआंतरराष्ट्रीय बालिका दिन: मुलींच्या सबलीकरणाचा संकल्प मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सूक्ष्म नियोजन व जबाबदाऱ्यांचे विकेंद्रीकरण करा : जिल्हाध्यक्ष विजय जाधवपुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता देवी जाधव आणि शिक्षक मतदार संघातून कौस्तुभ गावडे यांना मताधिक्य देणार : भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटीलकरवीर तालुक्यात राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचा प्रचार शुभारंभ उद्या; दिग्गज नेत्यांची राहणार उपस्थिती‘शिक्षण वाचवा, देश वाचवा!’; गारगोटीत विद्यार्थ्यांची जनजागृती फेरीउद्योजकीय यशासाठी शिस्त, वक्तशीरपणा, कठोर परिश्रम आवश्यक : डॉ. वेर्णेकरभुदरगड महसूल लोक अदालतीत २२ प्रकरणांमध्ये तडजोड; १७६ खातेदारांना लाभपन्हाळा महसूल लोक अदालतीत ३० प्रकरणांमध्ये तडजोड; १४२ खातेदारांना लाभजिल्हास्तरीय पाककृती स्पर्धेतून पोषण विषयक जनजागृती; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विभागाचे कौतुक

जाहिरात

 

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, मोरया हॉस्पिटल आणि दत्तकृपा क्लिनीकच्या पुढाकारातून आरकेनगर आणि चंबूखडी येथील मातोश्री वृध्दाश्रमात आरोग्य शिबिर

schedule09 Jul 24 person by visibility 848 categoryआरोग्य

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, मोरया हॉस्पिटल आणि दत्तकृपा क्लिनीकच्या पुढाकारातून, आर के नगर आणि चंबूखडी इथल्या मातोश्री वृध्दाश्रमात आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात शंभरपेक्षा अधिक वृध्दांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. तसंच आवश्यकतेनुसार गरजू रूग्णांना मोफत औषधे देण्यात आली.

कोल्हापुरातील आर के नगर इथल्या शिवाजी पाटोळे संचलित मातोश्री वृध्दाश्रमात ६० वृध्द राहतात. या वृध्दाश्रमाच्या अनेक अडचणी आहेत. वृध्दांच्या प्रकृतीच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या नूतन अध्यक्षा अरूंधती महाडिक यांच्या पुढाकारातून, आरोग्य शिबिराचं आयोजन केले होते. रोटेरियन बाळकृष्ण शिंपुकडे, रोटेरियन प्रतिभा शिंपुकडे, साहील शिकलगार, दिग्विजय पाटील तसंच मोरया हॉस्पिटलच्या मेडीकल ऑफिसर डॉ. सानिया धनवडे, निकिता जाधव, गणेश पाटील, शंकर पाटील यांच्या पुढाकारातून आज हे शिबिर पार पडले. रोटरी क्लब ही जगभरातील सामाजिक क्षेत्रात काम करणारी अग्रेसक संस्था आहे. मातोश्री वृध्दाश्रमासाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीनं सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे शिंपुगडे यांनी सांगितले.

 वृध्दाश्रमाचे संचालक अँड. शरद पाटोळे आणि शिवाजी पाटोळे यांनी वृध्दाश्रमाची उभारणी आणि अडीअडचणींबाबत माहिती दिली. दरम्यान या वृध्दाश्रमातील सर्व वृध्दांची आरोग्य तपासणी करून, गरजेनुसार औषधंही देण्यात आली. यावेळी जयश्री चौधरी, बबन माने उपस्थित होते.

 दरम्यान चंबुखडी इथल्या मातोश्री वृध्दाश्रमातही अशाच प्रकारे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. बी एस शिंपुगडे, प्रतिभा शिंपुगडे, शिंगणापूरच्या उपसरपंच सुवर्णा आवळे, उपसरपंच रूपाली चौगले, स्वाती कांबळे, ग्रामपंचायत सदस्या स्वाती पाटील, संगीता कलाल, स्मिता पाटील, दत्ता आवळे, वृध्दाश्रमाच्या अध्यक्षा वैशाली राजशेखर, सुर्यप्रभा चिटणीस यांनी मनोगत व्यक्त केले. तर डॉ. विजय पाटील, डॉ. सुप्रिया पाटील यांनी वृध्दांची वैद्यकीय तपासणी केली. शिवाय त्यांना दोन महिन्याची औषधे मोफत देण्यात आली. यावेळी शिवानी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes