संजय घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमीचे MHT-CET परीक्षेत यश
schedule21 Jun 24 person by visibility 366 categoryशैक्षणिक

अतिग्रे :अभियांत्रिकी ,औषधनिर्माण शास्त्र,कृषी शिक्षण पदवी या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (MHT-CET) नुकताच जाहीर झाला.या परिक्षेत संजय घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमीच्या ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सनटाईल गुण मिळाले. कोल्हापूर रिजन मध्ये अकॅडमीच्या एकूण चार विद्यार्थ्यांनी १०० पर्सनटाईल गुण मिळवले.
पीसीबी गटामधुन प्रतीक रामतीर्थकर हा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम आला तर सत्यजित जगताप याने दुसरा क्रमांक मिळवला. पीसीएम गटाचे विराज भोसले व माधव सोनी या दोघांनी १०० पर्सनटाईल गुण मिळवून संस्थेच्या यशाची परंपरा कायम राखली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संचालक वासू सर व प्राचार्य गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल बोलताना वासू म्हणाले, "क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही"
संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी,शिक्षक,पालक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन करून यशस्वी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.