SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष ट्री कटिंग उठाव मोहीमबालशिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी शासनाचा पुढाकार : आमदार यड्रावकरअवकाळीग्रस्त ३६८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३० लाख जमा कोल्हापूर मपालिकेच्यावतीने भगवान सर्वज्ञ श्री.चक्रधर स्वामी यांची जयंती साजरीमहिलांचे आरोग्य हे वैद्यकीय क्षेत्रासमोरील मोठे आव्हान: लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये 'युवावर्स' उत्साहातनकारात्मकतेला रामराम; सकारात्मक विचारांची जादू!जवाहर कारखान्याचे संस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे यांना जीवन गौरव पुरस्कारकोल्हापूर शहरातील डी.पी. रस्ते व आरक्षणे TDR माध्यमातून विकसित करण्याबाबत बैठकपाणीपट्टी थकबाकी तात्काळ भरण्याचे महापालिकेचे आवाहन; अनधिकृत कनेक्शन आढळल्यास 25 हजारांचा दंड व फौजदारी कारवाई

जाहिरात

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष ट्री कटिंग उठाव मोहीम

schedule13 Sep 26 person by visibility 28 categoryमहानगरपालिका

◼️शहरभर राबविलेल्या मोहिमेत अंदाजे १८० टन ट्री कटिंग साहित्याचा उठाव; ८ जेसीबी, १६ डंपर, २० आरोग्य निरीक्षक व ४० कर्मचाऱ्यांचा सहभाग

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मिरवणूक व विसर्जन मार्ग स्वच्छ, सुरक्षित आणि अडथळामुक्त ठेवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने आज, रविवार दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष ट्री कटिंग उठाव मोहीम राबविण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत शहरातील विविध भागांमधून अंदाजे १८० टन ट्री कटिंग साहित्याचा उठाव करण्यात आला.

गणेशोत्सवाच्या मिरवणुका व विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध मार्गांवर करण्यात आलेले ट्री कटिंग तसेच महावितरणमार्फत करण्यात आलेल्या झाडांच्या फांद्यांच्या छाटणीनंतर रस्त्याच्या कडेला पडून असलेले साहित्य वेळेत हटविण्यासाठी महापालिकेने विशेष नियोजन केले होते. त्यानुसार आज संपूर्ण शहरात एकाचवेळी ही मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेसाठी महापालिकेच्या दोन स्वतंत्र टीम कार्यरत करण्यात आल्या होत्या. दोन्ही टीमच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये पाहणी करून रस्त्याच्या कडेला, मिरवणूक मार्गावर तसेच विसर्जन मार्गावर पडून असलेले ट्री कटिंग साहित्य तातडीने उचलण्यात आले.
विशेष मोहिमेसाठी एकूण ८ जेसीबी व १६ डंपर उपलब्ध करून देण्यात आले होते. या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात ट्री कटिंग साहित्य उचलून संबंधित ठिकाणांहून हटविण्यात आले. दिवसभराच्या मोहिमेत अंदाजे १८० टन साहित्याचा उठाव करण्यात आला.

या कार्यवाहीमध्ये महापालिकेचे २० आरोग्य निरीक्षक आणि सुमारे ४० कर्मचारी सहभागी झाले होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून शहरातील विविध भागांमध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.
गणेशोत्सवाच्या कालावधीत मिरवणूक व विसर्जन मार्गावर वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, नागरिकांना सुरक्षितपणे मार्गक्रमण करता यावे तसेच आपत्कालीन सेवांच्या वाहनांना मार्ग सुकर राहावा, यासाठी महापालिकेने ही विशेष मोहीम हाती घेतली होती.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष ट्री कटिंग उठाव मोहीम

schedule13 Sep 26 person by visibility 48 category

Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

Settings
Theme
themes