राज्यातील नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुक निकालाची कोर्टाकडून नवी तारीख
schedule02 Dec 25 person by visibility 58 categoryराज्य
मुंबई : निवडणूक आयोगाने काही ठिकाणी निवडणुका 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्यामुळे आता राज्यात होणाऱ्या नगरपंचायत , नगरपरिषदेसाठी आज दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाचा निकालही लांबणीवर पडला आहे. याबाबतचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा कोर्टात अपील प्रलंबित असलेल्या किंवा नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी पुरेसा वेळ न मिळालेल्या ठिकाणी निवडणुका 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या होत्या.
पूर्वीच्या कार्यक्रमानुसार आज होणाऱ्या मतदानाची मतमोजणी उद्या 3 डिसेंबरला होणार होती. त्याविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती. यावर झालेल्या सुनावणीत दोन्ही टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर 21 डिसेंबरला एकत्रित मोजणी करण्याचा आदेश कोर्टाकडून देण्यात आला. त्यामुळे आज दोन डिसेंबर रोजी ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या होत आहेत. त्या उमेदवारांना समर्थकांना निकालाची 21 डिसेंबर पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे.