NCC मुले ही विविध राज्यांचे सांस्कृतिक दूत ; ब्रिगेडियर आर के पैठणकर
schedule27 Nov 25 person by visibility 44 categoryसामाजिक
कोल्हापूर : येथील एनसीसी गट मुख्यालय (कोल्हापूर ) यांच्यावतीने 'छत्रपती शिवाजी महाराज ट्रेक टेल ' ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेत विविध राज्यातून सामील होणारी मुले ही खऱ्या अर्थाने त्या - त्या राज्याचे सांस्कृतिक दूत असल्याचे प्रतिपादन ब्रिगेडियर आर के पैठणकर यांनी केले.
या मोहिमेंतर्गत आज महाराष्ट्र, तेलंगणा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील सुमारे 265 सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सहभागी विद्यार्थ्यांनी सुरक्षा तसेच सावधानता बाळगावी असे आवाहनही करून आज (शुक्रवारी) फक्त मुलींची तुकडी या मोहिमेत सामील होणार असल्याची माहिती श्री पैठणकर यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा तत्कालीन इतिहास मुलांना कळवा तसेच त्यांच्यात राष्ट्र समर्पणाची भावना वाढीस लागावी अश्या उद्देशाने प्रति वर्षाप्रमाणे 25 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत पन्हाळा ते विशालगड या मार्गावर राष्ट्रीय सेवा कोअर (NCC) कोल्हापूर मुख्यालयामार्फत देशातील विविध राज्यातील एनसीसी विद्यार्थ्यांच्या ट्रेकिंगचे (पदभ्रंमती) आयोजन करण्यात आले . यावेळी श्री पैठणकर यांच्या हस्ते या पदभ्रमंती मोहिमेत सहभागी झालेल्या तुकडीला झेंडा दाखवण्यात आला.
याप्रसंगी कर्नल (डेप्युटी) अनुप रामचंद्रन, 5 महाराष्ट्र बटालियन(कोल्हापूर) कमाडिंग ऑफिसर कर्नल मानस दीक्षित, सुभेदार मेजर ऑड.लेफ्ट. सुरेंद्र भोसले,सुभेदार सचिन पाटील यांच्यासह इतर अधिकारी - कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.