लाहोर : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या डेप्युटी स्पीकर यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला आहे, तो घटनाबाह्य घोषित केला आहे. दरम्यान काही दिवसांपासून इम्रान यांचे पंतप्रधान पद जाणार याबाबत चर्चा सुरु होती. परंतु इम्रान खान आता सत्ता राहणार आहेत. परंतु अविश्वास ठराव फेटाळल्यानंतर बोलताना इम्रान खान यांनी निवडणुकीसाठी तयार रहा असे आवाहान नागरिकांना केले आहे. २५ एप्रिलपर्यंत पाकिस्तानची संसंद स्थगीत करण्यात आली आहे.
आम्ही पुन्हा एकदा निवडणुकीत जाऊ इच्छीतो नागरिक ठरवतील काय करायचं असेही खान म्हणाले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा आज पंतप्रधान पदाचा फैसला होणार होता. आज अविश्वास प्रस्तावावर मतदानापूर्वी हिंसाचार आणि संघर्षाच्या भीतीने इस्लामाबादमध्ये हजारो सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते.