SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चिकोत्रा नदी पात्रात 'उपसाबंदी' जाहीर! जाणून घ्या तुमच्या भागातील तारीख आणि नियम...राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यात मोफत महा-शस्त्रक्रिया अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद; तीन दिवसांत 310 यशस्वी शस्त्रक्रिया"राज्यात पावसाची एन्ट्री! १७ मार्चपासून मेघगर्जनेसह बरसणार; शेतकऱ्यांची धाकधूक वाढली."क्रांतिकारी सरदार उधम सिंह: जालियनवाला बागेचा सूड घेणारा महानायकगॅस टंचाईला चाप! पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्यभर 'कंट्रोल रूम' सज्जसीपीआर रुग्णालयातील काही विभागांचे तात्पुरते स्थलांतरसंत एकनाथ सहकारी साखर कारखान्यातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी सुरू : सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलशिवाजी विद्यापीठात यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहातडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्याचे यूपीएससीमध्ये यश

जाहिरात

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

schedule13 Mar 26 person by visibility 85 categoryसामाजिक

कोल्हापूर  : अल्पमुदतीचा रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रम (STEP) योजनेअंतर्गत प्रशिक्षित उमेदवारांना तसेच इतर नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 16 मार्च रोजी स. 10.00 ते दु. 2.00 या वेळेत “अप्रेंटिसशिप प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आलेले आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर येथे 16 मार्च रोजी होणाऱ्या या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये इलेक्ट्रीशियन, वेल्डर, फिटर, आणि पंप मॅकेनिक पदांकरीता 340 पेक्षा जास्त रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. अल्पमुदतीचा रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रम (STEP )  प्रशिक्षीत उमेदवार तसेच 10 वी, 12 वी, आयटीआय पात्रता असणारे उमेदवार यासाठी पात्र आहेत. 

 इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.i‍n या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे तसेच प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व ‍शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार रिझ्युम सोबत आणणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes