SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महापौर रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 36 नागरिकांचे अर्ज दाखल; प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाडॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलला ‘रोटरी’ कडून अत्याधुनिक नेफ्रोकेअर उपकरणे; ६३ लाखांचे वैदयकीय साहित्य प्रदान गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; १८ ऑक्टोबरला मतदान, १९ ला निकालसंजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनांच्या पेन्शनमध्ये वाढ करा; शिष्टमंडळाची निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणीकोल्हापूर महानगरपालिकेची धडक कारवाई : परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या दोन आस्थापना सीलवर्गीस कुरियन: भारतातील धवल क्रांतीचे शिल्पकार आणि अमूलचे जनककोल्हापूरला ५०० खाटांचे नवीन जिल्हा रुग्णालय; ४,२५० कोटींच्या 'प्रगती' प्रकल्पास मंजुरीनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ग्रँड रेसिडेन्सी अपार्टमेंटच्या सामासिक अंतरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाईकोरे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची गॅलेक्सी सर्फॅक्टंट्समध्ये निवड; ६ लाखांचे पॅकेज

जाहिरात

 

महापौर रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 36 नागरिकांचे अर्ज दाखल; प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना

schedule09 Sep 26 person by visibility 115 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने शहरातील नागरिकांच्या समस्या व अडचणी थेट जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या ५ तारखेला महापौर  रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात येतो. सप्टेंबर महिन्यातील दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी शनिवारी सुट्टी असल्याने हा "जनता दरबार" आज महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी 36 नागरिकांनी विविध समस्या व मागण्यांबाबत अर्ज दाखल केले.

 

महापौर रुपाराणी निकम यांनी जनता दरबारात नागरिकांच्या समस्या व तक्रारी प्रत्यक्ष जाणून घेतल्या. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेत प्राप्त तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नागरिकांच्या प्रश्नांबाबत आवश्यक ती कार्यवाही करून त्याचा पाठपुरावा करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

 

जनता दरबाराच्या प्रारंभी महापौर  रुपाराणी निकम यांनी नागरिकांना आपल्या समस्या थोडक्यात व स्पष्टपणे मांडण्याच्या सूचना केल्या. यावेळी विविध विभागांशी संबंधित एकूण 36 अर्ज प्राप्त झाले. यामध्ये सहाय्यक आयुक्त कार्यालय – 3, नगररचना विभाग – 11, विभागीय कार्यालय क्र. 1 – 4, पाणीपुरवठा विभाग – 3, उद्यान विभाग – 2, इस्टेट विभाग – 2, अतिक्रमण विभाग – 2, मुख्य आरोग्य निरीक्षक कार्यालय – 2, विधी विभाग - 1, शहर अभियंता कार्यालय -1, रचना व कार्यपध्दती विभाग-1, सामान्य प्रशासन विभाग-2, घरफाळा विभाग-1 आणि केएमटी विभाग-1 अशा अर्जांचा समावेश आहे. नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी थेट व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करण्याचा प्रयत्न जनता दरबाराच्या माध्यमातून करण्यात येत आहे. 

 

यावेळी आरोग्य विशेष समिती उपसभापती वैभव माने, नगरसेविका मानसी लोळगे, उपआयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, नागेंद्र मुतगेकर, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, राम काटकर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, नगरसचिव दिवाकर कारंडे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, उपशहर रचनाकार महादेव फुलारी, पदमल पाटील, उपशहर अभियंता सुरेश पाटील, मिलिंद जाधव, रवका अधिकारी प्रशांत पंडत, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, सहाय्यक अभियंता नारायण पुजारी, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes