SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यातील २९ हजार कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होणार; शासकीय जमिनीवरील २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल होणारराधानगरी तालुक्यातील अवसायनात संस्थांच्या सुनावणीस गती द्या : अभिजीत तायशेटे, संचालक, गोकुळ दूध संघ कोल्हापूर येथील नियोजित फिश मार्केटला आवश्यक मदत व निधी देऊ : मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेकोल्हापूर भूमी अभिलेख झाले ‘हायटेक’; ३ कोटी ६९ लाखांच्या आधुनिक यंत्रसामग्रीचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरणदीड वर्षांपासून रखडले काम; उचगाव-गडमुडशिंगी रस्त्यासाठी शिवसेना मैदानात!महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर; सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव आदी जिल्ह्याचा समावेश भारतीय हवाई दलाचे ‘फ्लाईट सिम्युलेटर’ बनले विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू; केआयटी मध्ये भारतीय वायुदलाचा विशेष जनजागृती कार्यक्रमजागतिक कला व वारसा दिनानिमित्त विद्यापीठात ‘रंग कुंचल्याचे’ स्पर्धामहात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या अनुबंधाविषयी शिवाजी विद्यापीठात गुरूवारी चर्चासत्रडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजन

जाहिरात

 

गणेश चतुर्थी निमित्त वारणा दूध संघ सभासदांना देणार तूप

schedule19 Aug 25 person by visibility 527 categoryउद्योग

वारणानगर : वारणा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत गणेश चतुर्थीनिमित्त सभासदांना  तूप भेट देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली. दि. २० ते ३१ ऑगस्ट कालावधीत संबंधित प्राथमिक दूध संस्था, संघाची वितरण केंद्र व वितरक यांच्यामार्फत सभासदांना तूप वाटप होणार आहे.

वारणा दूध संघाच्या ज्या 'अ' वर्ग सभासदांनी शेअर पूर्ण केले आहेत व जे उत्पादक दुधाचा गावातील दूध संस्थामार्फत संघास पुरवठा करतात अशा 'अ' वर्ग सभासद, 'ब' वर्ग संस्था सभासद आणि राज्यभरातील 'क' वर्ग ग्राहक सभासदांना संघामार्फत दरवर्षी महाशिवरात्री, गणेशचतुर्थी व दीपावलीला सवलतीच्या दरात तूप भेट दिली जाते.

वारणा दूध संघाच्या कार्यक्षेत्रातील दूध संस्थांकडे सभासदांना दि.२१ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत तूप वितरित केले जाणार आहे. कोल्हापूर व परिसरातील 'अ' वर्ग व 'क' वर्ग सभासदांचे तुपाचे स्टेशन रोड कोल्हापूर येथील विक्री केंद्रातून वाटप होणार आहे. सभासदांनी सवलतीच्या दरातील तूप घेऊन जावे असे आवाहन संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी केले.

यावेळी संघाचे उपाध्यक्ष एच.आर. जाधव, फॅक्टरी मॅनेजर श्रीधर बुधाळे, मार्केटिंग मॅनेजर अनिल हेर्ले, संकलन व्यवस्थापक अशोक पाटील, असि. मॅनेजर अकौंटस प्रवीण शेलार, मार्केटिंग असि. मॅनेजर आर.व्ही.देसाई, प्रितीन बासष्टवार आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes