शिवाजी विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
schedule30 Apr 26 person by visibility 117 categoryराज्य
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठामध्ये आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रसंतांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी आजीवन अध्ययन व विस्तार कार्य अधिविभागप्रमुख डॉ. रामचंद्र पवार, हिंदी अधिविभागप्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी, डॉ. जयसिंग कांबळे, डॉ. संतोष कोळेकर, डॉ. प्रकाश मुंज, डॉ. अनिल मकर आणि डॉ. सुषमा मांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या अभिवादन कार्यक्रमास हेमंत जाधव, निकिता पाटील, पल्लवी वालेकर, अविनाश कांबळे, आनंदराव बेडगे, श्रीकांत देसाई, सुप्रिया पवार यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी राष्ट्रसंतांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली.