मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रातील गवताचा जाहीर लिलाव
schedule09 Jul 24 person by visibility 430 categoryराज्य

कोल्हापूर : मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, कोल्हापूर नवीन सर्किट हाऊस जवळ, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथील कुक्कुट पालन प्रक्षेत्राच्या जमिनीवरील अंदाजे (9 एकर 13 गुंठे) पावसाळी उभ्या हिरव्या गवताचा कापून नेण्याच्या अटीवर दिनांक 18 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता जाहीर लिलाव आयोजित करण्यात आला आहे.
मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र कोल्हापूर कार्यालयाच्या सूचना फलकावर लिलावाच्या अटी, शर्ती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. गवत पाहणी करण्यासाठी प्रक्षेत्राच्या व्यवस्थापनाशी कार्यालयीन वेळेत इच्छुकांनी संपर्क साधावा.
लिलावाच्या वेळी इच्छुकांनी अनामत रक्कम 500 रुपयांसह उपस्थित रहावे, असे आवाहन मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राचे पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. ए.एस.इंगळे यांनी केले आहे.