तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमीमध्ये 10, 11,12 जून रोजी शैक्षणिक क्षमता विकास प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन : प्राचार्य डॉ एम. टी. कलाधरण
schedule08 Jun 24 person by visibility 363 categoryशैक्षणिक

वारणानगर : येथील तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमी येथे दहा जून ते बारा जून या कालावधीत तीन दिवसीय शिक्षक क्षमता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमीचे प्राचार्य डॉ. एम. टी. कलाधरण यांनी दिली आहे.
शालेय शिक्षकांच्यासाठी बदलत्या शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार क्षमता विकास करणे तसेच कौशल्य व ज्ञान वाढवण्यासाठी व उच्च गुणवत्तेचे शिक्षण देण्यास सक्षम बनविण्यासाठी शिक्षकांसाठी तीन दिवसाचे प्रशिक्षण शिबिर व कार्यशाळा वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमीमध्ये आयोजित करण्यात आली असून यामध्ये नाविन्यपूर्ण शिकविण्याच्या पद्धती ,आगामी पिढीमध्ये दर्जेदार शिक्षण देण्याविषयी शिक्षण संस्थांची भूमिका वर्ग व्यवस्थापन व तंत्र शिक्षणात तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण, विद्यार्थी मूल्यांकन व मूल्यमापन ,विद्यार्थ्यांचा भावनिक आणि सामाजिक विकास या विषयांवर चर्चा होणार आहे.
याकरिता श्रीमती सुस्मिता मोहंती ,डॉ. शोभा कुंभार, डॉ. देवेंद्र सिंग यादव डॉ. किरण पाटील, डॉ. व्ही व्ही कर्जनी, अमेय महेश साखरे, डॉ. दिनेश सातपुते,सौ माहेश्वरी चौगुले व प्राचार्य डॉ.प्रकाश कुंभार आदी तज्ञांचे मार्गदर्शन प्रशिक्षणामध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकासाठी होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.व्ही.व्ही. कर्जनी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. असेही या प्रशिक्षण कार्यक्रमाचे संयोजक डॉ. एम टी कलाधरण यांनी माहिती देताना सांगितले यावेळी तात्यासाहेब कोरे मिलिटरी ऍकॅडमी चे टी बी रहाटवळ , प्रशांत जाधव व डी ए मुजावर हे उपस्थित होते या प्रशिक्षण कार्यक्रमात वारणा परिसरातील शंभर शिक्षक सहभागी होणार आहेत.