SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक सक्षमीकरणाबाबत विधीमंडळात चर्चानवीन खनिकर्म प्राधिकरणाचा घाट कशासाठी : आमदार सतेज पाटील यांचा सवालसुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 31 जुलै पर्यंत सहभागी होण्याचे आवाहनविधानसभा लक्षवेधी सूचना : राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच 'मेगा भरती' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘गोकुळ’च्या वासरू संगोपनातून दुग्ध व्यवसायास नवे बळ : नविद मुश्रीफकुरुंदवाड येथे तरुणाचा खून; अज्ञात आरोपी फरारीआय.डी.बी.आय. बँक ऑफ महाराष्ट्र व बँक ऑफ बडौंदा यांच्याकडून कर्मचाऱ्यांसाठी गमबुट, रेनकोटईशान अमेय खोपकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण!पीएमजीपी इमारतींच्या पुनर्विकासाबाबत एक महिन्याच्या आत बैठक : मंत्री शंभूराज देसाईतात्यासाहेब कोरे डिप्लोमा कॉलेजला व्हेरी गुड श्रेणी प्राप्त

जाहिरात

 

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागामार्फत विविध स्पर्धांचे आयोजन

schedule04 Apr 23 person by visibility 2638 categoryराज्य

कोल्हापूर : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. समाज कल्याण कार्यालयामार्फत सोमवार, दि. १० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक स्पर्धकांनी दिनांक ७ एप्रिल २०२३ पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात नाव नोंदणी करावी. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
 
स्पर्धेचे नाव, ठिकाण पुढीलप्रमाणे-
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील प्रसंगावर चित्रकला स्पर्धा- राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ, दसरा चौक, कोल्हापूर.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील प्रसंगांवर रांगोळी स्पर्धा - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, कोल्हापूर.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन व विचारांवर वक्तृत्व स्पर्धा - एस. जे. पी. इ. एस. होमिओपॅथिक मेडीकल कॉलेज, कोल्हापूर.
मी सावित्रीबाई बोलतेय किंवा मी ज्योतिबा बोलतोय या विषयावर एकपात्री प्रयोग स्पर्धा - शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर निबंध स्पर्धा - राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय, कोल्हापूर याप्रमाणे स्पर्धा होणार आहेत.

स्पर्धेमध्ये तीन क्रमांक काढण्यात येणार असून बक्षीसाचे स्वरुप खालीलप्रमाणे- प्रथम क्रमांक -रोख रक्कम रुपये पाच हजार, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक- रोख रक्कम रुपये तीन हजार, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह व तृतीय क्रमांक - रोख रक्कम रुपये दोन हजार, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह याप्रमाणे बक्षीस असणार आहे.
 
 🟣 स्पर्धेचे नियम व अटींकरीता तसेच नाव नोंदणीकरीता खालीलप्रमाणे संपर्क साधावा –
 महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील प्रसंगावर चित्रकला स्पर्धा - सचिन कांबळे ९९२२४९६९३०
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनातील प्रसंगांवर रांगोळी स्पर्धा - सुरेखा डवर ९७६५५०५५६६
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन व विचारांवर वक्तृत्व स्पर्धा - सचिन परब ८८८८४६८४८७
मी सावित्रीबाई बोलतेय किया मी ज्योतिबा बोलतोय या विषयावर एकपात्री प्रयोग स्पर्धा- अर्जुन घाटगे  ७७४४०४९२९२
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर निबंध स्पर्धा - अमोल खोत ७७०९७३४७९२
 
🟡 सर्व स्पर्धांकरीता सूचना- स्पर्धा कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी खुली राहील. विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालय, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवीची अंतीम परीक्षा दिली असेल तरी तो पात्र असेल. परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्व स्पर्धकांवर बंधनकारक असेल. सर्व स्पर्धांसाठी प्रवेश विनामूल्य असेल. स्पर्धा कोल्हापूर जिल्हा मर्यादित असेल. सर्व स्पर्धा सोमवार, दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी होतील.
 
स्पर्धेस येताना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे ओळखपत्र व ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणावी. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारेमाळ, कोल्हापूर येथे (0231-2651318) संपर्क साधावा, असेही लोंढे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes