तंबाखू मुक्त युवा अभियान ३.० अंतर्गत मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळेचे आयोजन
schedule02 Dec 25 person by visibility 44 categoryराज्य
कोल्हापूर : तंबाखू मुक्त युवा अभियान ३.० अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली “तंबाखू मुक्त शाळा” अंतर्गत दंतवैद्य डॉ. स्वाती इंगवले यांनी कार्यशाळेचे आयोजन केले होते. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय गडहिंग्लज डॉ. गीता कोरे व उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज डॉ. सी. जी. खोत, जिल्हा सल्लागार (NTCP) डॉ. व्ही. ए. आरळेकर यांनी तालुक्यात या अभियानाला गती देत व्यसनाधीनता प्रतिबंध मोहीम सुरू केली आहे.
यावेळी तंबाखू मुक्त संस्था संबंधित सादरीकरणाद्वारे उपस्थित मुख्याध्यापकांना माहिती देण्यात आली. यामध्ये चेकलिस्टचे सविस्तर विवेचन करण्यात आले. तसेच, समुपदेशनासह व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. तंबाखू सेवनाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम, व्यसनाधीनता प्रतिबंध, निरोगी शरीर आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली बाबत माहिती देण्यात आली.
कार्यशाळेचा लाभ परिसरातील ६० शाळांच्या शिक्षक व मुख्याध्यापकांनी घेतला.