SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा यंत्रणा सतर्क; पालकमंत्री प्रकाश आबिटकरजाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकराज्यात आरोग्य मोहिमांना नागरिकांचा उत्साही प्रतिसाददर महिन्याच्या ५ तारखेला ‘जनता दरबार’ : महापौर रुपाराणी निकम यांचा उपक्रमबारामतीतील शासकीय रुग्णालय व आयुर्वेद महाविद्यालयाला ‘स्व. अजित (दादा) पवार’ यांचे नाववन्यजीव: पृथ्वीचा अनमोल ठेवा आणि आपल्या अस्तित्वाचा आधार!पंचगंगा स्मशानभूमीत 'जादू ग्रुप'तर्फे शेणी दान उपक्रम हातमाग विणकरांसाठी 10 मार्च रोजी सोलापूर येथे हातमाग कापड स्पर्धेचे आयोजनअग्निवीर भरती २०२६ साठी १ एप्रिलपर्यंत ऑनलाइन नोंदणी सुरूसामाजिक न्याय विभागाच्या चित्ररथाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी

जाहिरात

 

महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचा ५ डिसेंबर ला राज्यव्यापी व्यापार बंद; उद्या १ डिसेंबर रोजी कोल्हापूर जिल्हास्तरीय व्यापारी परिषदेचे आयोजन

schedule30 Nov 25 person by visibility 281 categoryउद्योग

▪️परिषदेस व्यापाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व  दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशन चे आवाहन

कोल्हापूर  : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँन्ड अँग्रीकल्चर (मुंबई), फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई), चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अॅन्ड ट्रेड (मुंबई), दि ग्रेन, राईस अॅन्ड ऑईल सीडस् मर्चंटस् असोसिएशन (मुंबई) व दि पूना मर्चंटस् चेंबर (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समिती यांच्या तर्फे मंगळवार दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी दि पूना मर्चंटस् चेंबर, पुणे येथे महाराष्ट्रातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती व खाद्यान्न वस्तूंचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी राज्यव्यापी परिषदेचे आयोजन केले होते.

परिषदेत  कृषी उत्पन्न बाजार समिती नियमन (सेस) रद्द करा, लीगल मेट्रॉलॉजी कायदा नियम ३ मधील प्रस्तावीत बदल करु नये, (प्रस्तावीत बदल- अन्नधान्य, कडधान्य, मिरची इ. सर्व वस्तूंवर १ ते २५ किलो पर्यंत असणारा ५ टक्के जीएसटी बदलानंतर १ ते ५० किलो पर्यंत प्रस्तावित केला आहे) तसेच जीएसटी कायदा सुटसुटीत करावा याबाबत शुक्रवार दि. ५ डिसेंबर २०२५ रोजी राज्यस्तरीय व्यापार बंद पुकारण्यास इतर ६ ठराव केले आहेत.

 सदर परिषदेची माहिती देणे व कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची बंद बाबतची दिशा ठरविणे तसेच नियोजनासाठी सोमवार दि. १ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वा. दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशन, १५१७, सी, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर येथे कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची परिषद आयोजित केली आहे.

तरी या जिल्हास्तरीय व्यापारी परिषदेस जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे व दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष संजीव परीख यांनी पत्रकाव्दारे केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes