SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक: कोल्हापूर जिल्ह्यात चुरशीने मतदान; उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंदपरीक्षा अर्जासाठी ‘झिरो चलन’ सुविधा उपलब्ध : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलसिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे राज्यपालांना निमंत्रणघरफाळा थकबाकीदारांवर कोल्हापूर महापालिकेची कारवाई; दोन गाळे सील, पाच मिळकतींचे पाणी कनेक्शन खंडितशहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 62 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाईगोकुळच्या साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय मिळू दे; सतेज पाटील यांचे गाेकुळ संचालकांना घेऊन हालसिद्धनाथाला साकडेकोल्हापुरातील सायबर महाविद्यालयात २७ व २८ ऑक्टोबर रोजी ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’शालेय पोषण आहारात 'केंद्रीय किचन पद्धती'ला तीव्र विरोध; कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २६ ऑक्टोबरला निदर्शनेभुदरगड महसूल लोक अदालतीत २२ प्रकरणांमध्ये तडजोड; १७६ खातेदारांना लाभनवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवारी नवसाक्षरांची परीक्षा

जाहिरात

 

फुलेवाडीत ३० ऑक्टोबरपासून भव्य ‘फुलेवाडी महोत्सव’; विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन

schedule22 Oct 26 person by visibility 287 categoryउद्योग

कोल्हापूर : आनंद फाउंडेशन, नगरसेविका माधवी मानसिंग पाटील आणि संस्थापक मानसिंग आनंदराव पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने फुलेवाडीच्या इतिहासात पहिल्यांदाच ३०, ३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबर रोजी भव्य अशा ‘फुलेवाडी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव फुलेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे पार पडणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.


लहान-मोठे कलाकार, तरुण-तरुणी आणि महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाची आखणी करण्यात आली आहे. महोत्सवादरम्यान कराओके गाण्यांच्या स्पर्धा, महिलांसाठी लोकप्रिय 'होम मिनिस्टर' खेळ आणि पारंपरिक नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्याची तरुण पिढी मोबाईल गेम्समध्ये व्यस्त असल्याने त्यांना शिवकालीन देदीप्यमान इतिहासाची प्रत्यक्ष ओळख व्हावी, या हेतूने महोत्सवात 'शिवशस्त्र प्रदर्शन' भरवण्यात येणार आहे. याशिवाय, महिला व मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यशाळा आणि वाढत्या डिजिटल फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर 'सायबर क्राईम जनजागृती चर्चासत्र' आयोजित केले आहे. महोत्सवात येणाऱ्या नागरिकांसाठी विविध रुचकर खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही उपलब्ध असणार आहेत.

या सर्व उपक्रमांचा आणि महोत्सवाचा फुलेवाडीसह समस्त कोल्हापूरकरांनी, महिला भगिनींनी व कलाकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेविका  माधवी पाटील व मानसिंग पाटील यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes