SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
चोपडाई देवी यात्रेनिमित्त जोतिबा मार्गावर पार्किंगला बंदीकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात अखंड भारताचा सुवर्णकाळ: स्वातंत्र्यदिन आणि आपल्या कर्तव्याची दिशासोमवारी ‘या’ कारणामुळे बालिंगा पंपिंग स्टेशन राहणार बंद!राज्य शासनाच्या विविध योजनांसह महापालिका स्वनिधीतून १६६ कोटी ९३ लाखांची रस्त्यांची कामे सुरूकोल्हापूर महानगर पालिका : बेकायदेशीर नळ कनेक्शन रितसर करण्यासाठी १० दिवसांची मुदत; त्यानंतर दंडात्मक व फौजदारी कारवाईदत्तवाडचे आरोग्यमंदिर लवकरच जनतेच्या सेवेत : आमदार यड्रावकर देवीदास मिसाळ, कृष्णा ठाकरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच येथे अवमान याचिका दाखलनवापूर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय आढावा बैठक खुपिरेच्या बलमीम विकास संस्थेच्या संचालकावर कारवाई करावी अन्यथा आत्मदहन; सामाजिक कार्यकर्ते सरदार बंगे यांचा इशारा

जाहिरात

 

चोपडाई देवी यात्रेनिमित्त जोतिबा मार्गावर पार्किंगला बंदी

schedule15 Aug 26 person by visibility 153 categoryराज्य

कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी), ता. पन्हाळा येथे दि. 17 व 18 ऑगस्ट रोजी श्री क्षेत्र चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा होत आहे. यात्रेनिमित्त महाराष्ट्रासह इतर राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक मोटार वाहनांनी जोतिबा डोंगरावर येत असतात. जोतिबा डोंगरावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 33 (1) (क) अन्वये वाहतूक नियमन आदेश जारी केले आहेत.

जोतिबा डोंगरावरील वाहनांची संख्या, उपलब्ध पार्किंग व्यवस्था तसेच भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता प्रमुख मार्गांवर वाहनांचे पार्किंग झाल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. भाविकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी दानेवाडी फाटा क्रॉसिंग ते जुने आंब्याचे झाड, प्रवासी टोलनाक्याजवळील नवीन एस.टी. बसस्थानक रोड, जुने एस.टी. स्टँड रोड, सेंट्रल प्लाझासमोरील रोड, पी.डब्ल्यू.डी. रेस्ट हाऊससमोरील रोड, यमाई मंदिर कॉर्नर, गिरोली घाट ते गिरोली फाटा (श्रावणी हॉटेल) या मार्गावर सर्व प्रकारच्या मोटार वाहनांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे.

ही अधिसूचना 17 ऑगस्ट रोजी रात्री 12.01 वाजेपासून 18 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes