SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळमध्ये महायुतीचा चेअरमन होण्याचा मार्ग मोकळाअध्यादेशाच्या विरोधात कोल्हापुरात पेटला सहकाराचा असंतोष; 'गोकुळ'वरील सरकारचा डाका खपवून घेणार नाही!सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामातील साखर पोत्याचे नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पूजन‘गोकुळ’वर शासननियुक्त सदस्यांचा घाला; सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात विराट ‘संघर्ष मोर्चा’!राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन: न्याय सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्पगोकुळ दूध संघाचे १२ संचालक २९ ऑक्टोबरपासून बेपत्ता; शोध घेऊन हजर करण्याची डाव्या आघाडीची पोलिसांकडे मागणी, अन्यथा ५.५ लाख शेतकरी रस्त्यावर उतरणार!शासननियुक्त संचालकांच्या अध्यादेशाला समविचारीचे न्यायालयात आव्हान; उद्या सर्किट बेंचमध्ये सुनावणी गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात उद्या संघर्ष मोर्चाआदिवासी पाड्यात मंत्री मंगलप्रभात लोढा यांची दिवाळी; चिमुकल्यांना दिल्या भेटवस्तूंच्या अनमोल भेटी; शैक्षणिक साहित्य, खेळणी, फटाके आणि सायकलींचे वाटपआदिवासी पाड्यात मंत्री मंगलप्रभात लोढा यांची दिवाळी; चिमुकल्यांना दिल्या भेटवस्तूंच्या अनमोल भेटी; शैक्षणिक साहित्य, खेळणी, फटाके आणि सायकलींचे वाटप

जाहिरात

 

गोकुळमध्ये महायुतीचा चेअरमन होण्याचा मार्ग मोकळा

schedule09 Nov 26 person by visibility 124 categoryराज्य

◼️ उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमधील सुनावणी पूर्ण
          
कोल्हापूर : गोकुळ दूध संघामध्ये महायुतीचा चेअरमन होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसमोर सुरू असलेली याबाबतची सुनावणी पूर्ण झाली आहे. न्यायमूर्ती श्री. एन. पी. धोटे यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
​         
याबाबत अधिक माहिती अशी, आमदार सतेज  पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने उद्या म्हणजेच मंगळवार दि. १० रोजी होणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या चेअरमन निवडीला आणि महाराष्ट्र सरकारकडून होत असलेल्या चार तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्तीला न्यायालयात आव्हान दिले होते. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष या सुनावणीकडे लागले होते. 
​        
याबाबत अधिक माहिती अशी, सरकारने केलेल्या या तज्ज्ञ संचालक नियुक्तीच्या अध्यादेशाला न्यायालयाने स्थगिती दिली नाही. हा निर्णय देताना न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, चेअरमन निवडीची प्रक्रिया नियमानुसार राबवून निकाल जाहीर करण्यास सांगितले आहे. परंतु; या संदर्भाने होणाऱ्या अंतिम सुनावणीच्या अधीन राहून न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे.  
​          
या सुनावणीत महायुतीच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मुकुल रोहतगी आणि ॲड. अनिल अंतुरकर, ॲड. अनिल साखरे, समविचारी आघाडीच्यावतीने ॲड. अभिषेक मनु सिंघवी आणि ॲड. श्रीकृष्ण गणबावले, महाराष्ट्र शासनाच्यावतीने ॲड. अश्विनी भिडे यांनी, महाराष्ट्र राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाच्यावतीने ॲड. प्रल्हाद परांजपे आणि  काम पाहिले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes