SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिलपंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्याने आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांची पंपिंग स्टेशनला भेट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनाकोल्हापूर : महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईएमसीईडीमार्फत 'उद्योजकता विकास प्रशिक्षण'चे आयोजनडीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवडकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधकोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरीअहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधवद्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

जाहिरात

 

रोटरी क्लब कोल्हापूर हेरिटेज आणि आरसीकेओपी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू महिलांना पिंक रिक्षा वाटप

schedule16 May 26 person by visibility 359 categoryसामाजिक

🟣 महापौर रूपा राणी निकम यांच्या हस्ते रिक्षांचे वितरण; महापौरांनी चालवली रिक्षा

कोल्हापूर  : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज आणि आरसीकेओपी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यातील गरजू महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना पिंक रिक्षाचे वाटप करण्यात आले. महापौर रूपा राणी निकम यांच्या हस्ते या रिक्षांचे वितरण सदर गरजू महिलांना करण्यात आले. यल्लमा मंदिर चौका जवळील आयटी पार्क रोडवरील श्वास वाटिका या रोटरी क्लबने विकसित केलेल्या उद्यानाच्या नजीक हा कार्यक्रम संपन्न झाला. रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१७० चे गव्हर्नर श्री.अरुण भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. 

याप्रसंगी महापौर रुपाराणी निकम यांनी महिला सक्षमीकरणासाठी रोटरी क्लब ने उचललेले हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद असून शासनाने गरजू महिलांना पिंक रिक्षा वाटपाबाबत ठरवलेल्या धोरणाबाबत पाठपुरावा करून अधिकाधिक महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि कोल्हापूर शहरात जास्तीत जास्त महिलांनी रिक्षा चालवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो .अरुण भंडारे यांनी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज ने समाजासाठी राबवलेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे कौतुक करून हेरिटेज क्लबने समाज उपयोगी कामाचा डोंगर उभा केल्याचे सांगितले. पिंक रिक्षा वितरण कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन रो. प्रशांत कुलकर्णी यांनी या उपक्रमाचा आढावा घेऊन रोटरी हेरिटेज तर्फे भविष्यकाळात देखील अधिकाधिक महिलांना पिंक रिक्षाचे वाटप करून स्वावलंबी बनवण्यासाठी रोटरी क्लब प्रयत्नशील राहील असे सांगितले.

रोटरी हेरिटेज क्लबच्या प्रेसिडेंट रो.पूजा गांधी, सेक्रेटरी रो .श्रुती मंत्री, कोषाध्यक्ष रो . प्रशांत मेहता तसेच या पिंक रिक्षासाठीचे देणगीदार रो.भरत जाधव याचबरोबर क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.महापौरांनी या प्रसंगी स्वतः रिक्षा चालवून फेरफटका मारला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटेरियन बिपिन जाजू यांनी केले. याप्रसंगी रोटरी क्लब ने विकसित केलेल्या श्वास वाटिका येथे महापौर रूपाराणी निकम तसेच रोटरी गव्हर्नर अरुण भंडारे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. महापौर रूपाराणी निकम यांनी रोटरीने विकसित केलेल्या  श्वास वाटिके ची पाहणी करून हेरिटेज क्लब चे कौतुक केले तसेच  उद्यानाला आवश्यक असेल ती सर्व मदत पुरवण्याचे आश्वासन दिले. रोटरीच्या माध्यमातून विकसित झालेल्या या उद्यानाचा नागरिकांना मोठा फायदा होत असल्याचे सांगितले. याचबरोबर रोटरी क्लबच्या माध्यमातून शहराच्या विकासाला मोठा हातभार लागत असल्याचे सांगून रोटरीच्या कामाचे कौतुक केले..या प्रसंगी पिंक रिक्षा च्या  लाभार्थी स्मिता मगदूम व प्रभावती राशिवडे या महिलांचा तसेच  इव्हेंट चेअरमन प्रशांत कुलकर्णी व देणगीदार रोटेरियन भारत जाधव यांचा महापौर महापौर रूपा राणी निकम व  रोटरी चे गव्हर्नर अरुण भंडारे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला तसेच रिक्षा च्या चाव्या लाभार्थी महिलाना देऊन त्यांना शुभेच्छा देणेत आल्या.आभार प्रदर्शन प्रेसिडेंट पूजा गांधी यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes