SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
लोकशाही दिनामध्ये प्राप्त झालेल्या अर्जावर तातडीने निर्णय घ्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे; 165 अर्ज प्राप्तमाध्यमांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अपरिहार्य: सम्राट फडणीस; राज्यातील नऊ विद्यापीठांच्या पत्रकारिता विभागांद्वारे राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानविद्यापीठातील कट्ट्यांनी पुन्हा अनुभवले ‘वाचणारे’ विद्यार्थी!खत उत्पादक कंपन्यांनी लिंकिंग होणार नाही, याची दक्षता घ्या : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर; लिंकिंग झाल्याचे आढळल्यास कारवाई करापोलीस यंत्रणांनी दोषसिध्दीचे प्रमाण वाढविण्याबरोबरच महिलांच्या गुन्ह्यांमागील कारणांचा शोध घ्यावा : उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हेनांदणी येथील जैन मठासाठी आवश्यक सोयी सुविधांसह तीर्थक्षेत्राचा अ दर्जा देणार : मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस; अलमट्टीबाबत गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जावूकोल्हापूर शहराच्या विकास कामांसाठी 50 कोटींचा निधी द्यावा : जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी काँग्रेसचे निष्ठावंत नेते पी. एन. पाटील यांच्या 72 व्या जयंतीदिनी अभिवादनएचएमपीव्ही (HMPV) बाबत नागरिकांनी काळजी करु नये, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे : प्रकाश आबिटकरआयजीएमला आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधा देणार : सार्वजानिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

जाहिरात

 

सर्व मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; प्रत्येक मेट्रो मार्गाचा घेतला आढावा

schedule04 Jan 25 person by visibility 212 categoryराज्य

मुंबई : एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व मेट्रोंचे कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा;  या कामांना विलंब चालणार नाही, पुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान 50 किमी मेट्रो कार्यान्वित होतील, असे नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी  फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ उपस्थित होते.

यावेळी  फडणवीस म्हणाले, अनेक ठिकाणी कारशेड शिवाय मेट्रो सुरू होत आहेत, त्यामुळे मेट्रो सुरू करण्यासाठी त्यासाठी थांबू नका. जगात असे प्रयोग होत आहेत, त्याचा अभ्यास करा. त्याला तात्पुरत्या पर्यायी व्यवस्था काय आहेत, याचा आढावा घ्या. भविष्यातील सर्व संभाव्य मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेत, त्यासाठी कारशेडसाठी जागा आतापासूनच आरक्षित करा. पुढच्या वर्षीपासून 50 किमी मेट्रो दरवर्षी सुरू होईल, याबाबत नियोजन करा. यावर्षी किमान 23 किमी मेट्रो सुरू होईल. तसेच मेट्रो-3 मुळे २० ते २५ किलोमीटरची त्यात आणखी भर पडेल.

 इंदू मिल येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक डिसेंबर २०२५ अखेरीस पूर्ण करा. तसेच हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून या दोन्ही प्रकल्पांच्या वार्षिक देखभालीसाठी आराखडा आताच तयार करण्याच्या सूचना फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नगरविकास विभाग (1) चे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी,  मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे,  मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी,मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे  अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार , अश्विन मुदगल, महामुंबई मेट्रो संचलन महामंडळ व्यवस्थापकीय संचालक रुबल आगरवाल, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचे सादरीकरण केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes