SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
'नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल'चे नियम धाब्यावर बसवून कोल्हापुरात वृक्षहत्या; सुराज्य अभियानाची फौजदारी कारवाईची मागणी५०० हून अधिक भाताचे प्रकार बनवून कोल्हापुरात नवा जागतिक विक्रम रचणार; मास्टर शेफ दिग्विजय भोसलेंची घोषणाकृषी पणन मंडळामार्फत शहरात मिलेट व फळ महोत्सवास प्रारंभशिवाजी विद्यापीठात २४ एप्रिलला शाश्वत शेती परिषदमुंबईत घुमणार युवाशक्तीचा आवाज; कृष्णराज महाडिक यांच्या संकल्पनेतून ध्येय-धोरणांचा जागर!कोल्हापूर : घरफाळा करात ३० जूनपर्यंत ६ टक्के सवलतशहरातील नाले सफाईमधून 25 डंपर गाळ उठावलिशा हॉटेल ते सदरबाजार चौक परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाईकोल्हापूर जिल्ह्यात 'जनगणना २०२७' अंतर्गत १ ते १५ मे दरम्यान नागरिकांना 'स्वयंगणना' करण्याची सुविधाजागतिक वसुंधरा दिन पर्यावरणीय संकल्पाचा मुहूर्त

जाहिरात

 

बारामती, राहुरी पोटनिवडणुकीसाठी प्रचाराची सांगता; महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती

schedule21 Apr 26 person by visibility 195 categoryराजकीय

बारामती : बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सांगता सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. 

या सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव केला आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात बारामतीचा विकास पुढे नेण्याची ग्वाही दिली.
राज्याला सलग ११ अर्थसंकल्प सादर करून विकासाचा पाया रचण्यात अजित दादांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. अजित दादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत जनमानसात असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी, या प्रकरणातील सत्य बाहेर येईपर्यंत शासन स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

नीरा नदीजोड प्रकल्प, जनाई शिरसाई बंदिस्त पाईपलाईन, शिवसृष्टी, बाह्य वळण रस्ता आणि कर्करोग रुग्णालय यांसारखी अजित दादांनी सुरू केलेली शेकडो कामे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात पूर्ण केली जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, या पोटनिवडणुकीत राजकीय परंपरेला साजेसा निर्णय घेत काँग्रेससह इतर पक्षांनी उमेदवार न दिल्याने मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले.
या प्रसंगी सुनेत्रा पवार यांनी अजित दादा पवार यांच्या स्मृती चिरकाल टिकवण्यासाठी आणि त्यांच्या कार्याची माहिती पुढच्या पिढीला देण्यासाठी 'अजित दादा पवार म्युझियम' उभारण्याची घोषणा केली.

 सभेपूर्वी मुख्यमंत्र्यांनी बारामतीतील अजित पवार यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली. या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत येत्या २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes