घोडावत विद्यापीठात होणार जागतिक दर्जाचे डिझाईन स्कूल हॅमस्टेक कॉलेज सोबत सामंजस्य करार; डिझायनर नीता लुल्ला यांची उपस्थिती
schedule22 May 26 person by visibility 137 categoryशैक्षणिक
अतिग्रे : संजय घोडावत विद्यापीठात जागतिक दर्जाचे डिझाईन स्कूल व्हावे यासाठी भारतातील अग्रगण्य हॅमस्टेक कॉलेज ऑफ क्रिएटिव्ह एज्युकेशन सोबत दिनांक 23 मे रोजी सामंजस्य करार होणार आहे. डिझाईन क्षेत्रातील करियर संदर्भात सकाळी 11 वा. सुप्रसिद्ध राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त फॅशन डिझायनर नीता लुल्ला मार्गदर्शन करणार आहेत.
30 वर्षापासून डिझाईन क्षेत्रात कार्यरत असलेली हॅमस्टेक संस्थेच्या करारामुळे डिझाईन क्षेत्रात कार्य करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जागतिक दर्जाचे स्कूल उभारून फॅशन डिझाईन, इंटिरियर डिझाईन, कम्युनिकेशन डिझाईन, आणि प्रॉडक्ट डिझाईन या विषयांमध्ये विशेष बॅचलर ऑफ डिझाईन (B.Des) अभ्यासक्रम उपलब्ध असतील.
यावेळी नीता लुल्ला डिझाईन स्कूलच्या सेलिब्रिटी मेंटॉर म्हणून सहभागी होत आहेत. फॅशन आणि भारतीय चित्रपट सृष्टीतील त्यांचा प्रवास, डिझाईन क्षेत्रातील अनुभव विद्यार्थ्यांसोबत शेअर करणार आहेत. तसेच त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी प्राप्त होणार आहे.
डिझाईन क्षेत्राविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थी पालक यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे संयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. यासाठी हेमस्टेज कॉलेज ऑफ क्रिएटिव्ह एज्युकेशन चे चेअरमन योगेश कुमार, निष्ठा रेड्डी, विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले, विश्वस्त विनायक भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, डिझाईन विभागाचे प्रमुख डॉ. सोमेश गुरव विशेष मार्गदर्शन करत आहेत. या उपक्रमास विद्यापीठाचे प्रेसिडेंट संजय घोडावत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.