SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीच्या प्रा. शिल्पा पाटील यांना पीएच.डी. पदवी प्रदानघोडावत फौंडेशन तर्फे प्रीतम आनंद वृद्धाश्रमास मदतशिरोळ तालुका क्रीडा संकुलासाठी ५ कोटींचा निधी मंजूर; आमदार यड्रावकर यांचा पाठपुरावा ; आणखीन ५o कोटींचा प्रस्ताव कॅबिनेटकडे सादर राष्ट्रवादी भवन येथे ‘भारतीय संविधान दिन’ उत्साहात; २६/११ च्या शहिदांना श्रद्धांजलीनिधीअभावी बंद पडलेले 'आपला दवाखाने' तात्काळ सुरू करा; अन्यथा आरोग्यमंत्र्यांची गाडी अडवूखेबवडेतील बुद्ध विहार पाणवट्याचा प्रश्न मार्गी; सागर भोगम यांनी दिलेला शब्द पाळला!लोकशाहीचा प्राणवायू: भारतीय संविधान दिन आणि डॉ. बाबासाहेबांचा अमूल्य वारसामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे महापौर रूपाराणी निकम यांचे निवेदनशिवाजी विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत समारंभ २७ नोव्हेंबरला; तनुजा साळोखे यांना राष्ट्रपती, तर वेदिका कदम यांना कुलपती सुवर्णपदककोल्हापूर महानगरपालिका : चालू आर्थिक वर्षात घरफाळा व पाणीपट्टीसाठी अभय योजना लागू करण्याचा कोणताही विचार प्रशासनाचा नाही- आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड

जाहिरात

 

कोरे अभियांत्रिकीच्या प्रा. शिल्पा पाटील यांना पीएच.डी. पदवी प्रदान

schedule26 Nov 26 person by visibility 110 categoryशैक्षणिक

वारणानगर : वारणा विद्यापीठांतर्गत अग्रणी संस्था असलेल्या तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त), वारणानगर येथील केमिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रा. शिल्पा सर्जेराव पाटील यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्याकडून केमिकल इंजिनिअरिंग विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.

त्यांनी “स्टडीज ऑन रिमुव्हल ऑफ हेवी मेटल आयन्स फ्रॉम इंडस्ट्रियल वेस्टवॉटर” या विषयावर संशोधनपर प्रबंध सादर केला. या संशोधनासाठी त्यांना डॉ. एस. व्ही. आणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, वारणानगर येथील केमिकल इंजिनिअरिंग विभाग हे त्यांचे संशोधन केंद्र होते.

वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच त्यांनी अभिनंदन केले. तसेच प्राचार्य डॉ. के. आय. पाटील अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, विभागप्रमुख, डॉ. पी. बी. डेहनकर आणि विभागातील सहकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes