SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बाल व किशोरवयीन कामगार ठेवणाऱ्यांवर कारवाईअभियंत्यांनी उद्योगाभिमुख कौशल्ये आत्मसात करावीत: डॉ. राजाराम गुरवपरिक्षा कालावधीत 100 मीटर परिसरात इलेक्ट्रॉनिक वस्तू बाळगण्यास बंदीतिलारी घाटातील बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा; कोल्हापूर पोलिसांच्या कामगिरीवर ५० हजारांचे बक्षीसकोल्हापूरचे किशोर घाटगे यांची 'ग्राहक संरक्षण समिती'च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवडआंतरराष्ट्रीय खेळ दिन: बालपणाचा अविभाज्य आनंद आणि हक्ककोल्हापूर महानगरपालिका : गुरुवारी ‘जनता दरबार’ — महापौर रुपाराणी निकम यांचा उपक्रमराज्यातील एमआरआय, सीटी स्कॅन व पीईटी सीटी स्कॅन प्रकल्पांना गती देणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफडॉग शेल्टर, पथदिवे व जनरल बजेटमधील विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण निर्णयबिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार चौक परिसरात महापालिकेची धडक अतिक्रमण कारवाई

जाहिरात

 

परिक्षा कालावधीत 100 मीटर परिसरात इलेक्ट्रॉनिक वस्तू बाळगण्यास बंदी

schedule11 Jun 26 person by visibility 91 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यात माध्यमिक शालांत (इयत्ता 10 वी) व उच्च माध्यमिक (इयत्ता 12 वी) परीक्षेकरीता 24 परीक्षा केंद्रे असून परिक्षा 16 जून ते 8 जुलै या कालावधीत घेण्यात येणार आहेत.

जिल्हयात ज्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागीय मंडळामार्फत उच्च माध्यमिक (इयत्ता 12 वी) व माध्यमिक शालांत (इयत्ता 10 वी) परीक्षा घेण्यात येणार आहेत अशा परीक्षा केंद्रांच्या/उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरात 16 जून  ते 8 जुलै या परीक्षा कालावधीत (ज्या दिवशी परीक्षेचे पेपर नसतील ते दिवस वगळून) दररोज सकाळी 7 वा. पासून ते सायं. 6 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये परीक्षा केंद्रांच्या/उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरात मोबाईल फोन जवळ बाळगणे, त्या संबंधी इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगण्यास/वापरण्यास, झेरॉक्स मशिन, फॅक्स मशिन व लॅपटॉप यांचा वापर करण्यास अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी बंदी घातली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील. हा बंदी आदेश परीक्षेच्या कामकाजासाठी नेमलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना नेमून दिलेल्या परिक्षेच्या कामकाजासाठी हाताळाव्या लागणाऱ्या उपकरणांसाठी लागू राहणार नाही.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes