SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा १४ जूनला मुंबईतशेतकऱ्यांनी रेशीम उत्पादनातून प्रगती साधावी : जिल्हाधिकारी अमोल येडगेशिष्यवृत्तीच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक महाविद्यालयात ‘नोडल अधिकारी’ म्हणून प्राध्यापकांकडे जबाबदारी : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटीलशासकीय योजनांचा लाभ घेवून महिलांनी वेगवेगळ्या व्यवसायाद्वारे आपले कुटुंब सक्षम बनवावे : अरुंधती महाडिक शिवचाफा महोत्सवाला आजपासुन सुरवात 2000 रोपांचे वाटपकोल्हापूर जिल्ह्यामध्ये बकर ईद (ईदुल अजहा) मोठ्या उत्साहात ; मुस्लिम बोर्डीगच्या पटांगणावर नमाज पठाण मुस्लिम बांधवांची ईदुल-अजहा (बकर ईद) शनिवारी, नमाज वेळापत्रकसस्पेन्स थ्रीलर 'शातिर - द बिगिनिंग' येत्या 13 जून रोजी होणार प्रदर्शितकोल्हापुरात सोमवारी, मंगळवारी पाणी पुरवठा बंद; काळम्मावाडी पंपिंग स्टेशनची होणार दुरुस्तीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या वीज प्रश्नांवर सोमवारी जनता दरबार; तक्रार अर्ज दाखल करण्याचे आवाहन

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यात 6 मार्च पर्यंत मनाई आदेश जारी

schedule21 Feb 25 person by visibility 374 categoryराज्य

 कोल्हापूर : जिल्ह्यात विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्याकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलन करण्यात येत असून विविध पक्षाकडून रॅली, सभेचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात यात्रा, सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत.  या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कारणांमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये प्रभारी अपर जिल्हादंडाधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते दिनांक 6 मार्च 2025 रोजी रात्रौ 12.00 वाजेपर्यंत मनाई आदेश जारी केला आहे.

 हा हुकूम सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजाविण्यासंदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतली आहे, 

अशा व्यक्तींना, तसेच सर्व जातीधर्माचे सण, उत्सव, जयंती, यात्रा शांततामय मार्गाने साजरे करण्यासाठी जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा यांना लागू असणार नाही, असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes