SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
'स्ट्रोक' रुग्णांसाठी " रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन” प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याच्या आरोग्यमंत्र्याच्या सुचनारोटरी क्लब कोल्हापूर हेरिटेज आणि आरसीकेओपी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू महिलांना पिंक रिक्षा वाटपअर्थशास्त्र अधिविभागात माजी विद्यार्थी मेळावाकामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘POSH’ कायद्याची कडक अंमलबजावणी; राज्यभर तपासणी मोहीमगांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदकेंद्र सरकारच्या ऊस नियंत्रण धोरणाविरोधात जय शिवराय किसान संघटनेची कोल्हापुरात पत्रकार परिषद; नवीन कायद्यावर कडाडून टीकाधक्कादायक! 'तो' कुटुंबासह कोकण दर्शनाला गेला अन मागे मित्रानेच लुटले घर; कोल्हापुरात १५ लाखांच्या दागिन्यांसह एक गजाआडडीकेटीईच्या विद्यार्थ्यांची हरियाणा येथील बूटकॅम्पमध्ये चमकदार कामगिरीराष्ट्रीय डेंग्यू दिवस: जनजागृती आणि सतर्कतेची गरज

जाहिरात

 

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कयाकिंग व कॅनॉईंग स्पर्धा २०२५-२६: स्पर्धेवर पंजाबच्या विद्यापीठांचे वर्चस्व

schedule06 Apr 26 person by visibility 370 categoryक्रीडा

शिवाजी विद्यापीठाच्या महिलांची लक्षवेधक कामगिरी
सांगली : भारतीय विद्यापीठे महासंघ (ए.आय.यू.) आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कयाकिंग व कॅनॉईंग (पुरुष व महिला) स्पर्धेत आज दुसऱ्या दिवसअखेर स्पर्धेत अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठाने वर्चस्व प्राप्त केले. त्याखालोखाल मोहालीचे चंदीगड विद्यापीठ आणि चंदीगडचे पंजाब विद्यापीठ यांच्या क्रीडापटूंनीही लक्षवेधी कामगिरी केली. शिवाजी विद्यापीठाच्या महिलांनी के-१ (१००० मीटर), सी-१ (१००० मी.) आणि के-४ (१००० मी.) या स्पर्धांत चतुर्थ स्थान पटकावले.

येथील कृष्णा बोट क्लबमध्ये आज झालेल्या स्पर्धांत गुरू नानक देव विद्यापीठाने पुरुष गटातील के-२, सी-२ व के-४ आणि महिला गटातील के-१ व के-२मध्ये अव्वल कामगिरी केली. चंदीगड विद्यापीठानेही पुरुष व महिला गटातील के-२ व के-४ प्रकारात उत्तम कामगिरी नोंदवली. पंजाब विद्यापीठाने महिला गटातील सी-१ आणि सी-२ स्पर्धांत प्रथम क्रमांक मिळवला. लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाने पुरुष गटातील सी-१ मध्ये अव्वल येत उपस्थितांची वाहवा मिळवली. 

स्पर्धेतील १००० मीटर अंतराच्या विविध गटांतील निकाल अनुक्रमे (कंसात विद्यापीठ व नोंदविलेली वेळ याप्रमाणे) असे:
पुरुष गट: 
K1 (1000 मीटर) – वंश शर्मा (मोहनलाल सुखाडिया विद्यापीठ, राजस्थान, 03:41.35), थांगसंबाम डी. (लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, पंजाब, 03:48.15), मनवीर सिंह (पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 03:49.82), अनोश बारला (बरकतुल्लाह विद्यापीठ, भोपाळ, 03:51.53), 
C1 (1000 मीटर) –हर्ष पाल (लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, 04:02.54), हर्ष शर्मा (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर, 04:11.89), प्रशांत चौधरी (चंदीगड विद्यापीठ, मोहाली, 04:16.72), अभिषेक नवले (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, 04:21.86)
K2 (1000 मीटर) –आदित्य सिंह, सचिन (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर, 03:18.44), शुभम, मनवीर सिंह (पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 03:18.95), वंश, देव चौधरी (चंदीगड विद्यापीठ, 03:30.43), प्रथमेश पाटील, निरंजन पाटील (भारती अभिमत विद्यापीठ, पुणे, 03:36.86)
C2 (1000 मीटर) – प्रिन्स गोस्वामी, हर्ष वर्मा (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर, 03:42.13), दर्शन मोरे, अल्पेश धुळे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, 03:45.33), सिद्धांत, अतुल (पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 03:47.38)
K4 (1000 मीटर) – मयंक शर्मा व सहकारी (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर, 03:02.44), आदर्श बिजू व सहकारी (चंदीगड विद्यापीठ, मोहाली, 03:06.70), प्रथमेश पाटील व सहकारी (भारती अभिमत विद्यापीठ, पुणे, 03:08.48), कृतिक कुमार व सहकारी (पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 03:08.74).
महिला गट:
K1 (1000 मीटर) –चंद्रकला कुशवाहा (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर, 04:15.40), निधी (चंदीगड विद्यापीठ, मोहाली 04:18.04), दिव्यांशी राघोरटे (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागरूप विद्यापीठ, नागपूर, 04:34.40), उर्वशी घुगरें (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, 04:44.88)
C1 (1000 मीटर) - निक्की (पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 04:45.83), ऋतिका कुमारी (गुरू काशी विद्यापीठ, भटिंडा, 04:58.59), ओ. बिड्या लक्ष्मीदेवी (चंदीगड विद्यापीठ, मोहाली, 05:00.38), प्रिया चव्हाण (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, 05:19.94)
K2 (1000 मीटर) – कुसुम, अचल काचरू साहरे (चंदीगड विद्यापीठ, मोहाली, 04:04.04), लवप्रीत कौर, चंद्रकला कुशवाहा (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर, 04:15.41), दीप्ती, जस्मीन (पाँडिचेरी विद्यापीठ, पुदुच्चेरी, 04:24.78), अल्पना सानी, नंदिनी (पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 04:27.89)
C2 (1000 मीटर) –प्रिया चौरसिया, रिशिका कुमारी एक्का (पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 04:29.83), ऋतिका कुमारी, रिया (गुरू काशी विद्यापीठ, भटिंडा, 04:50.27), नीतू सपनवाने, मनमती बघेल (पं. रवीशंकर शुक्ला विद्यापीठ, रायपूर, 05:00.71) 
K4 (1000 मीटर) –रिशिता व सहकारी (चंदीगड विद्यापीठ, मोहाली, 03:42.76), भूमी सोनकर व सहकारी (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर, 03:50.15), कुसुम गुप्ता व सहकारी (पंजाब विद्यापीठ, चंदीगड, 04:00.74), उर्वशी घुगरे, आरती जाधव, शुहाना जमादार व निकिती मगदूम (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, 04:13.23).

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes