SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीत वार्षिक गुणगौरव सोहळा उत्साहात महिन्यापूर्वी सुनावणी झालेल्या दूध संस्थांचे निकाल द्या; गडहिंग्लज तालुक्यातील संस्थांची मागणीसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये इंडस्ट्रियल सेफ्टी बॅचचा उत्साहात निरोप समारंभकल्पनेपासून कृतीपर्यंत : केआयटीमध्ये उद्योजकतेचा प्रेरणादायी जागरजागतिक थायरॉईड दिन: आरोग्य आणि जागरूकतेचा संदेशशिवाजी विद्यापीठात उद्यापासून जागतिक पर्यावरण अभियानराज्यसभा पोटनिवडणुकीसाठी १८ जूनला मतदानउत्पादन आणि लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेईएम रुग्णालयात अत्याधुनिक ‘व्हेसल सीलर’ उपकरणे उपलब्ध; गरीब रुग्णांना मोठा दिलासा'स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील म्हणजे तळागाळातील कार्यकर्त्यांचा आधारवड'

जाहिरात

 

महिन्यापूर्वी सुनावणी झालेल्या दूध संस्थांचे निकाल द्या; गडहिंग्लज तालुक्यातील संस्थांची मागणी

schedule25 May 26 person by visibility 176 categoryउद्योग

▪️निकालाला विलंब हा सुद्धा अन्यायच     
         
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या सभासद असलेल्या गडहिंग्लज तालुक्यातील दूध संस्थांना अंतरीम अवसयानाचे आदेश मिळाले होते. त्याबाबतची सुनावणी महिन्याभरापूर्वी झाली. परंतु; अद्यापही या सुनावणीचे निकाल मिळालेले नाहीत. या दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी सुनावणीचे निकाल आजच्या आज द्या, अशी आग्रही माहिती सहाय्यक दुग्ध निबंधकांकडे केली.
            
सुनावणी झालेल्या दूध संस्थांच्यावतीने सहाय्यक निबंधक- दुग्ध यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आम्हा अंतरिम अवसायांनाची नोटीस मिळालेल्या सर्व संस्थांची सुनावणी गेल्या महिन्यात दि. २४ एप्रिल रोजी म्हणजेच बरोबर एक महिन्यापूर्वी झाली. शासन व दुग्ध विभागाकडून संस्था व शेतकरी हिताचे निर्णय तत्परतेने होणे अपेक्षित असताना निकाल देण्यात होत असलेला अनावश्यक टाळाटाळ व विलंब हा अन्यायकारक,  निष्काळजीपणाचा प्रकार असल्याबद्दल संस्थाप्रतिनिधींनी संतप्त भावना व्यक्त केल्या. 
                 
▪️शेतकऱ्यांत असंतोष......!
अधिकाऱ्यांसमोर संस्था प्रतिनिधींनी सुनावणीचे निकाल मिळत नसल्यामुळे येणाऱ्या अडचणींची गा-हाणी मांडली. या विलंबामुळे संस्थांच्या दैनंदिन कामकाजावर गंभीर परिणाम होत असून दूध संस्था, दूध उत्पादक शेतकरी व सभासदांमध्ये मोठया प्रमाणात संभ्रम आणि असंतोष निर्माण झाला आहे. अनेक संस्थांची आर्थिक व प्रशासकीय कामे रखडली असून शेतकन्यांना विविध अडचर्णीना सामोरे जावे लागत असल्याकडेही लक्ष वेधले.

▪️गडहिंग्लज तालुक्यातील अंतरिम अवसायनाचे आदेश मिळालेल्या संस्थांची सुनावणी महिन्यापूर्वी पूर्ण झाली. या सुनावणीचे निकाल तातडीने द्या, अशी आग्रही मागणी दूध संस्था प्रतिनिधींनी सहाय्यक निबंधक- दुग्ध कृष्णा ठाकरे यांच्याकडे निवेदनाने केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes